Home /News /maharashtra /

देशात विघटन करणाऱ्या शक्तीचा उन्माद.. म्हणत साध्वी प्रज्ञासिंह यांची सोनियांवर टीका

देशात विघटन करणाऱ्या शक्तीचा उन्माद.. म्हणत साध्वी प्रज्ञासिंह यांची सोनियांवर टीका

मालेगाव 2008 बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आणि भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह गुरुवारी एनआयए कोर्टात हजर झाल्या.

ठाणे,27 फेब्रुवारी: मालेगाव 2008 बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आणि भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह गुरुवारी एनआयए कोर्टात हजर झाल्या. एनआयए कोर्टाचे न्यायाधीश व्ही.एस. पडळकर यांनी मे 2019 मध्ये काढलेल्या आदेशानुसार या प्रकरणातील सर्व मुख्य आरोपीना आठवड्यातून एकदा कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, साध्वी प्रज्ञासिंह जून 2019 नंतर कोर्टात हजर झाल्या नव्हत्या. मालेगाव प्रकरणाची आज सुनावणी होती. या सुनावणीस खासदार साध्वी प्रज्ञासिंह हजर राहिल्या. दिल्ली हिंसाचार, आयबी कॉन्स्टेबलच्या हत्येप्रकरणी AAP नेत्याविरोधात गुन्हा दाखल खासदार प्रज्ञासिंग 2008 मध्ये मालेगाव ब्लास्ट प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. देशात भाजप देशहिताच्या संदर्भातच निर्णय घेत असून भाजप देशाचे कधीच वाईट करणार नसल्याचे साध्वी प्रज्ञासिंह यांनी सांगितले. कोर्ट परिसरात त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. भाजपने घेतलेले निर्णय देशाला मजबूत करणारे असून देशात सध्या विघटन करणाऱ्या शक्ती उन्माद करीत असल्याचे साध्वी प्रज्ञासिंह यांनी यांनी आरोप केला. सोनिया गांधी यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण त्यांच्या मागणीत नैतिकता किती हे आणीबाणी व 1984 च्या दंगलीच्या काळात दिसून आल्याची खोचक टीका करत साध्वी प्रज्ञासिंह यांनी सोनिया गांधी यांना टोला लगावला. NPR अर्ज 2010 च्या जनगणनेनुसार ठेवण्यासाठी काँग्रेस आग्रही; शिवसेनेची मिळणार का सहमती? दरम्यान, नुकतेच मुंबई हायकोर्टाने 2008 मालेगाव बॉम्बस्फोट संदर्भात होणाऱ्या दिरंगाईबद्दल एनआयए या तपास यंत्रणेला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. या बरोबरच एनआयए कोर्टाकडून सुनावणी दरम्यान विलंबावर मुंबई हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली होती. काल या प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी होती. सुनावणीदरम्यान या प्रकरणातील आरोपी सुधाकर चतुर्वेदी याने मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणाच्या केस डायरीच्या कागदपत्रांची मागणी केली असता अशा कुठल्याही प्रकारची केस डायरी कोर्टात सादर करण्यात आली नाही, असे एनआयए कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सुधाकर चतुर्वेदी या आरोपीने गैरप्रश्न विचारुन कोर्टाचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी आरोपी सुधाकर चतुर्वेदी यास 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी पुन्हा 28 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Latest news

पुढील बातम्या