शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेवर गिरीश बापट म्हणतात...

शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेवर गिरीश बापट म्हणतात...

भाजप नेते आणि खासदार गिरीश बापट यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेवर भाष्य केलं आहे.

  • Share this:

अद्वैत मेहता, पुणे, 19 ऑक्टोबर : 'शरद पवारांनी पावसात सभा घेतली त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढेल, पण मतदारांवर परिणाम होणार नाही. राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचीच ही लढाई आहे. राष्ट्रवादी निदान लढली, मात्र काँग्रेस कुठं दिसलीच नाही,' असं म्हणत भाजप नेते आणि खासदार गिरीश बापट यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेवर भाष्य केलं आहे.

विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारासाठी आज अखेरचा दिवस आहे. अखेरच्या दिवशीही आरोप-प्रत्यारोपांनी प्रतीस्पर्धी उमेदवारांना घायाळ करण्याची एकही संधी राजकीय नेते सोडताना दिसत नाहीत. भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांनी राष्ट्रवादीवर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

अजित पवारांबाबत आरोप

'शरद पवार यांनी ईडीला अंगावर घेऊन माहोल तयार केला होता. पण नाराज अजित पवारांनी त्याला छेद दिला. अजित पवारांना जागावाटपात डावलले गेले त्याचा फटका राष्ट्रवादीला बसेल,' असं म्हणत गिरीश बापट यांनी राष्ट्रवादीतच अंतर्गत कलह असल्याचं सुचवलं आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी गिरीश बापट यांनी केलेल्या या टीकेला अजित पवार आणि राष्ट्रवादी कसं उत्तर देणार हे पाहावं लागेल.

गिरीश बापट यांचा विरोधकांवर हल्लाबोल

- कोथरुडमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी ला उमेदवार मिळाला नाही

- कोथरूडमध्ये सुरुवातीला ब्राह्मण उमेदवार म्हणून जातीयवाद आणला गेला. पण भाजपचेच अण्णा जोशी राष्ट्रवादीकडून लढले होते

- चंद्रकांत पाटील यांच्यावर बाहेरचा उमेदवार म्हणून टीका झाली, पण पवार बारामतीचे असून माढा इथून लढले होते

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात फिरकले नाहीत अशी टीका होत आहे. मात्र विरोधकांकडे मुद्दे नाहीत

- कसबा हा बालेकिल्ला अभेद्य राहील

- पुण्यात पुन्हा सर्व 8 जागा जिंकू

साताऱ्या शरद पवारांचा झंझावात

शरद पवार यांची सातारा इथं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसाठी सभा पार पडली. या सभेवेळी तिथं जोरदार पावसाने हजेरी लावली. पण पाऊस कोसळत असतानाही शरद पवार यांनी आपलं भाषण सुरुच ठेवलं. शरद पवारांच्या या कृतीने सभेला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या उर्जेसाठी ओळखले जातात. वयाच्या 79 व्या वर्षीही ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यामुळे अनेकजण आश्चर्यही व्यक्त करतात. त्यातच आता सातारा इथल्या शरद पवार यांनी पाऊस सुरू असतानाही केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा होत आहे.

पाऊस नाही शरद पवार बरसले, भरपावसातलं UNCUT भाषण

First published: October 19, 2019, 4:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading