वेगळ्या विदर्भाच्या मागणीला सरकारी उत्तर, आशिष देशमुखांचा भाजपला इशारा

वेगळ्या विदर्भाच्या मागणीला सरकारी उत्तर, आशिष देशमुखांचा भाजपला इशारा

लवकरच पक्षाचा राजीनामा देणाच्या देशमुख विचारात असल्याचीही चर्चा आहे.

  • Share this:

10 फेब्रुवारी : विदर्भाला स्वतंत्र दर्जा द्या असं पत्रच भाजपचे काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं होतं. पण प्रशासनाने थातुरमातुर उत्तर दिल्यामुळे आशिष देशमुख संतापले आहे. त्यांना राजीनाम्याचा इशारा दिलाय.

आशिष देशमुख यांनी पत्र लिहून विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या पत्रावर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने उत्तर दिले आहे. आशिष देशमुखांच्या पत्राला उत्तर देतांना सामान्य प्रशासन विभागाने आपल्या मागण्या या विविध विभागाशी संबंधित असल्याने त्या त्या विभागाला ते पाठवत असल्याचं उत्तर दिलंय.

विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा हे भाजपच्या जाहिरनाम्यातील आश्वासना बद्दल आमदार आशिष देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनावर पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली होती.  पण यावर मुख्यमत्र्यांनी कधीही प्रतिक्रिया न देता आता आमदार आशिष देशमुख यांच्या पत्राला राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने थातुरमातुर उत्तर दिल्याने आमदार देशमुख संतापले आहे. लवकरच पक्षाचा राजीनामा देणाच्या देशमुख विचारात असल्याचीही चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2018 07:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading