ऊसतोड मजुरांसाठी कोण धावून गेलं? आता 'त्या' निर्णयाबाबत बीडमध्ये श्रेय वादाचं राजकारण

ऊसतोड मजुरांसाठी कोण धावून गेलं? आता 'त्या' निर्णयाबाबत बीडमध्ये श्रेय वादाचं राजकारण

ऊसतोड मजुरांना स्वगृही पाठवण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर बीड जिल्ह्यात श्रेय वादाचं राजकरण उफाळून आलं आहे.

  • Share this:

बीड, 19 एप्रिल: ऊसतोड मजुरांसाठी कोण धावून गेले, हे ऊसतोड मजुरांना माहीत आहे, असं सांगत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील ऊसतोड मजुरांच्या घरवापसीच्या मुद्द्यात उडी घेतली आहे.

ऊसतोड मजुरांना स्वगृही पाठवण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर बीड जिल्ह्यात श्रेय वादाचं राजकरण उफाळून आलं आहे. या संदर्भात फेसबुकवरून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे समर्थक आमने-सामने आले होते. याला कोट करत आता भाजपचे आमदार सुरेश धस देखील यावर टिप्पणी केली आहे. सरकारकडून ऊसतोड मजुरांना स्वगृही पाठवण्याबाबत आदेश निघाला असला, तरी देखील ऊसतोड मजूर पाठवायचे कसे सध्या सरकारला माहीत नाही. त्यामुळे बीडचे पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांनी स्वतः जिल्ह्यातून गाड्या पाठवून मजुरांना आणावं, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.

हेही वाचा.. सरकारी पेन्शनमध्ये होणार 20 टक्के कपात? अर्थ मंत्रालयाने दिलं हे स्पष्टीकरण

दरम्यान, राज्यातील 38 साखर कारखान्यातील 1 लाख 31 हजार ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याचा राज्य शासनाचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अर्थमंत्री जयंत पाटील यांचे आभार मानले होते. ऊसतोड कामगारांच्या व्यथा, वेदनांना आता विराम मिळाला असंही पंकजा म्हणाल्या होत्या.

ऊसतोड कामगारांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, आता शांत आणि समाधानी वाटत आहे. माझे लोक घरी जातील. ऊसतोड कामगारांचा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष संपला आहे. त्यांच्या व्यथा, वेदनांना विराम मिळाला आहे. ते आता स्वतःच्या घरी जाऊ शकतील. प्रशासनाने त्यांना सुरक्षितपणे घराकडे पोहोचवावे. कामगारांनी देखील प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, आणि आपापल्या घरी सुखरूप पोहोचावे तसेच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

हेही वाचा.. ... आणि जेव्हा SP ने स्वत: ट्रॅक्टरला मारला धक्का, VIDEO VIRAL

लॉकडाऊनमुळे राज्यात ठिकठिकाणी ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने अडकले आहेत. हे सर्व कामगार एकत्र असल्याने त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे त्यांची तपासणी करून सर्वांना सुरक्षितपणे घरी पाठवावे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी सातत्याने सरकारकडे लावून धरली होती. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करत होत्या. निर्णयास विलंब होत असल्याने त्या आक्रमक झाल्या होत्या. अखेर राज्यसरकारने ऊसतोड कामगारांच्या घरवापसीचा आदेश शुक्रवारी काढला. राज्य सरकारच्या आदेशाचं पंकजा मुंडे यांनी स्वागत केलं आहे.

हेही वाचा.. कल्याण-डोंबिवलीत कोरोना हॉटस्पॉट जाहीर, 122 पैकी 20 प्रभाग संवेदनशील

राज्य सरकारने ऊसतोडणी कामगार, ऊस वाहतूक करणारे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मुळगावी पाठवण्याबाबत शुक्रवारी मोठा निर्णय घेतला आहे. ऊसतोड मजुरांचा स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून देत श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला अशी टीका भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

'तुमचा स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. शासनाने यासंबंधी आदेश निर्गमित केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून घरी परता. स्वतःच्या आरोग्याची त्याचबरोबर आपल्या गावाचीही काळजी घ्‍या. स्वगृही परतल्यावर कुटुंबासह घरातच रहा', असं धनंजय मुंडे यांनी ट्वीट करून ऊसतोड मजुरांना आवाहन केलं होतं. आता ऊसतोड मजुरांना स्वगृही पाठवण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर बीड जिल्ह्यात श्रेय वादाचं राजकरण उफाळून आलं आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 19, 2020, 5:00 PM IST

ताज्या बातम्या