पोलिसांची भीती दाखवून मजुरांवर ऊसतोडणीसाठी जबरदस्ती, सुरेश धसांचा गंभीर आरोप

पोलिसांची भीती दाखवून मजुरांवर ऊसतोडणीसाठी जबरदस्ती, सुरेश धसांचा गंभीर आरोप

पोलिसांची भीती दाखवून ऊसतोड मजुरांवर ऊसतोडणीची जबरदस्ती केली जात असल्याचा धक्कादायक आरोप माजी मंत्री आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

  • Share this:

बीड, 4 एप्रिल: पोलिसांची भीती दाखवून ऊसतोड मजुरांवर ऊसतोडणीची जबरदस्ती केली जात असल्याचा धक्कादायक आरोप माजी मंत्री आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

पुणे जिल्ह्यातील काही साखर कारखान्यावर पहाटे पाच वाजता पोलिस ऊसतोड मजुरांना झोपेतून उठवायला येतात. उसतोडणीला जा अशा धमक्या देतात हे कुठल्या नियमात बसत. ज्या साखर कारखण्यांनी ऊसतोड मजुरांना वाऱ्यावर सोडल त्यांच्यावर कारवाई होणार आहे का? असा प्रश्न सुरेश धस यांनी उपस्थित केला. तसेच सरकार या गोरगरीब ऊसतोड मजुराच्या जीवाशी खेळत आहे, त्या विरोधात बोललं तर चूप बैठो नही तो कान काटुंगा, म्हणत गुन्हे दाखल करत आहेत. या सरकारच्या भूमिकेला कायम विरोध राहील, असेही सुरेश धस म्हणले गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी ते आष्टी येथे माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा.. 'माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर त्यांच्यासह कुटुंबीयांना होम क्वारंटाईन करा'

दोन दिवसांपूर्वी ऊसतोड मजूरांवर भिगवण-राशीन हद्दीत पोलिसांनी अमानुष मारहाण केल्यानंतर त्यांच्या मदतीला मी गेलो म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला. असले हजारो गुन्हे दाखल करा मी अंगावर झेलायला तयार आहे. मला अटक झाली तरी मी यावर जामीन सुद्धा घेणार नाही, अशी भूमिका सुरेश धस यांनी घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचा विमा उतरविला जातो, ऊसतोड कामगारांचा देखील 50 लक्ष रुपयांचा विमा कारखारदारांनी उतरविला पाहिजे अशी मागणीसुद्धा आमदार धस यांनी केली.

हेही वाचा... मदरस्याची जागा आयसोलेशन वार्डसाठी देणार, मौलाना हारिस दस्तगीर यांची घोषणा

स्व. गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्या लवादामध्ये ऊसतोड मजूरांना घरी सोडण्यापर्यंतची जबाबदारी ही कारखान्यांची होती.अशावेळी हा नियम लागू होत नाही का? तीन-तीन जिल्हे ओलांडून हे कामगार परतले मग तिथले प्रशासन काय करत होते,त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे असले हजारो गुन्हे दाखल झाले तरी मी ते अंगावर घ्यायला तयार आहे आणि अटक केले तर मी जामीन सुद्धा करणार नाही म्हणत आ.धस यांनी राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली.

हेही वाचा..लॉकडाऊनमध्ये नागपुरात हातभट्टीवर फिल्मी स्टाईल रेड, लाखोंचा माल केला नष्ट

आजच्या दिवशी देखील राज्यत 25 पेक्षा जास्त कारखाने सुरु आहेत, इसेन्सियल कम्युडिटी अॅक्टनुसार साखर कारखाने सुरु ठेवत आहेत. मग त्या मजुरांमध्ये सोशल डिस्टंट आहे का? एका कारखान्यावर आज तीन ते पाच हजार कामगार आहेत ही गोष्ट कोणी लक्षात घेत नाही. केवळ 50 रुपये वाढवून देऊ आणि किराणा देऊन मजूरांची बोळवण करु हा कोणता नियम आहे तर त्यांच्या जिविताशीच खेळण्याचा हा प्रकार आहे.शेवटी ते देखील माणसच आहेत याचा सरकार ने विचार करावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली.

First published: April 4, 2020, 8:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading