किरण मोहिते, प्रतिनिधीसातारा, 19 फेब्रुवारी : भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती खालवली आहे. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यानंतर आता शिवेंद्रराजे यांना मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रक्तदाबाचा त्रास झाल्याने शिवेंद्रराजे अस्वस्थ झाले. त्यांना सध्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना ठिक वाटत नसल्याने आता मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवेंद्रराजे यांना साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं गेलं. तर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी प्रकृती ठीक असून त्यांना बरं वाटल्यास घरी सोडणार होते. पण त्यांना बरं वाटत नसल्यामुळे मुंबईत दाखल करणार असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवेंद्रराजे हे त्यांच्या 'सुरुची' बंगल्यावर होते. यावेळी त्यांना रात्री उशिरा अचानक रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना कुटुंबियांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. शिवेंद्रराजे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी वेदांतिका राजेदेखील रुग्णलायात असल्याची माहिती देण्यात आली. शिवेंद्रराजेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
इतर बातम्या - शिवजयंती : छत्रपती शिवरायांचे अनमोल विचार; आचरणात आणाल, तर बदलेल तुमचं जीवन
खरंतर, राजकारणी मंडळी म्हटलं की दिवसभर कामाचा व्याप आणि ठिकठिकाणी दौरे असतात. वारंवार सभा आणि कार्यक्रमासाठी फिरत राहावं लागतं. अशात आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अनेकदा भर सभेत राजकारण्यांना कामाच्या व्यापामुळे त्रास झाल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. त्यामुळे कामाच्या तणावात आरोग्याची काळजी घेणं फार शक्य होत नाही.
इतर बातम्या - पुलवामाच्या त्रालमध्ये चकमक, सुरक्षादलाने 3 दहशतवाद्यांना केलं ठार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.