Home /News /maharashtra /

भाजप आमदार राम सातपुते अपघातातून थोडक्यात बचावले, कारचे 3 टायर फुटले

भाजप आमदार राम सातपुते अपघातातून थोडक्यात बचावले, कारचे 3 टायर फुटले

माळशिरस तालुक्यात आले असताना अचानक गाडीचे टायर फुटले आणि गाडी रस्त्याच्या बाजूला आली.

माळशिरस तालुक्यात आले असताना अचानक गाडीचे टायर फुटले आणि गाडी रस्त्याच्या बाजूला आली.

माळशिरस तालुक्यात आले असताना अचानक गाडीचे टायर फुटले आणि गाडी रस्त्याच्या बाजूला आली.

    सोलापूर, 20 मे : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील भाजपचे आमदार राम सातपुते (bjp mla ram satpute) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. गाडीचे टायर फुटल्यामुळे हा अपघात झाला होता. सुदैवाने या अपघातातून राम सातपुते थोडक्यात बचावले आहे. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. भाजपचे आमदार राम सातपुते आज दुपारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होते. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र निरा नरसिंहपुर येथे देवेंद्र फडणवीस यांनी आपले कुलदैवत लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन घेतले. यावेळी सातपुते सोबत होते. त्यानंतर परतत असताना माळशिरस तालुक्यात आले असताना अचानक गाडीचे टायर फुटले आणि गाडी रस्त्याच्या बाजूला आली. पण या अपघातातून राम साातपुते थोडक्यात बचावले आहे. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. (असा काय गुन्हा झाला? फक्त लेकीचा Video लाइक केला म्हणून आईला डांबलं तुरुंगात) राम सातपुते यांनी फेसबुकवर व्हिडीओ लाईव्ह करून आपण सुखरूप असल्याचे सांगितलं. 'आज मतदार संघातील प्रवासादरम्यान माझा अपघात झाला, यामध्ये गाडीचे तीन टायर फुटले, परंतु जनताजनार्दनाच्या आशीर्वादाने आणि पांडुरंगाच्या कृपेने मला व माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची इजा अथवा काहीही दुखापत झाली नाही'असं सातपुते यांनी सांगितलं. (सावधान! Income Tax च्या नावावर होऊ शकतो Fraud; कोणत्याही SMS ला बळी पडू नका) राम सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. सातपुते यांच्या गाडीला अपघात झाला याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना फोन करून विचारणाही केली. मात्र, गाडीचे तीन टायर फुटून सुद्धा आपल्याला कोणतीही इजा झाली नाही, काळजी करू नका, मी ठीक आहे, असं आवाहनही राम सातपुते यांनी केलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या