मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोदी द्वेषी महाराष्ट्र सरकार भूकबळीची वाट पाहात का? भाजपची विखारी टीका

मोदी द्वेषी महाराष्ट्र सरकार भूकबळीची वाट पाहात का? भाजपची विखारी टीका

लॉकडाऊनमुळे गरिबांना दोन वेळेचं अन्न मिळणं कठीण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

लॉकडाऊनमुळे गरिबांना दोन वेळेचं अन्न मिळणं कठीण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

लॉकडाऊनमुळे गरिबांना दोन वेळेचं अन्न मिळणं कठीण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 5 एप्रिल : कोरोनाचं संकट आणि त्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गरिबांना दोन वेळेचं अन्न मिळणं कठीण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'केवळ आणि केवळ मोदी द्वेषापोटी मोदी सरकारने दिलेले मोफत धान्य अजून पर्यंत महाराष्ट्र सरकार गोरगरिबांना वाटायला तयार नाही,' अशी घणाघाती टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. 'महाराष्ट्र सरकार काय भूकबळी ची वाट पाहत आहे का? मोदी द्वेषापोटी दिवे तुम्ही लावणार नाही आम्ही समजू शकतो. मात्र मोदी सरकारने दिलेले मोफत धान्य तुम्हाला वाटायला अडचण काय? कधी देणार? तर 15 एप्रिल नंतर! तोपर्यंत काय बोंबा मारायच्या? सरसकट रेशन कार्ड असेल... नसेल प्रत्येकाला मोफत धान्य महाराष्ट्र सरकारने दिलेच पाहिजे. ही आमची आग्रही मागणी आहे,' असं राम कदम यांनी म्हटलं आहे. दरम्यान, स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवस-रात्र काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा तसेच डॉक्टर नर्सेस आणि आरोग्य विभागात त्काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार टप्प्याटप्प्याने न देता त्यांना पगार एकदाच तोही वेळेवर दिलाच पाहिजे आणि या सर्वांना त्याने दिवस-रात्र आपल्या कुटुंबाला सोडून केलेल्या सेवेबद्दल बोनस देऊन आदर्श माणुसकीचा सन्मान करावा, अशीही मागणी राम कदम यांनी केली आहे. पवार-ठाकरेंमध्ये झाली आहे चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. पिवळ्या रेशनिंग कार्डसोबतच राज्यातील केशरी रेशनिंग कार्ड धारकांना येत्या आठवड्यात धान्य उपलब्ध करून देण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्य सरकारने जर केशरी रेशन कार्डधारकांनाही धान्य उपलब्ध करून दिल्यास राज्यावर साधारण 300 कोटी रूपये अतिरिक्त बोजा पडणार आहे. मात्र राज्यात रेशनिंग धान्य उपलब्ध होत नसल्याने लोकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे सरकार हा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत असल्याचं दिसत आहे.
First published:

Tags: Ram kadam, Uddhav thackeray

पुढील बातम्या