मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

''संभाजीराजेंनी मांडलेली भूमिका मराठा समाजाच्या हिताची, पण...''

''संभाजीराजेंनी मांडलेली भूमिका मराठा समाजाच्या हिताची, पण...''

Maratha Reservation:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर संभाजी राजेंनी पत्रकार परिषदेत घेतली. या परिषदेत त्यांनी राज्य सरकारला 6 जूनपर्यंत अल्टिमेटम दिलं आहे.

Maratha Reservation:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर संभाजी राजेंनी पत्रकार परिषदेत घेतली. या परिषदेत त्यांनी राज्य सरकारला 6 जूनपर्यंत अल्टिमेटम दिलं आहे.

Maratha Reservation:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर संभाजी राजेंनी पत्रकार परिषदेत घेतली. या परिषदेत त्यांनी राज्य सरकारला 6 जूनपर्यंत अल्टिमेटम दिलं आहे.

शिर्डी, 29 मे: मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंनी मांडलेली भूमिका मराठा समाजाच्या हिताची आहे. मात्र नुसते अल्टीमेटम न देता सर्व मराठा संघटनांना सोबत घेऊन एकत्र भूमिका मांडण्याची गरज असल्याचं भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांनी महाराष्ट्राचा दौरा करत सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेतली. दरम्यान शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर संभाजी राजेंनी पत्रकार परिषदेत घेतली. या परिषदेत त्यांनी राज्य सरकारला 6 जूनपर्यंत अल्टिमेटम दिलं आहे. 6 जून शिवराज्यभिषेकदिनी मराठा समाजाची निर्णायक भूमिका किल्ले रायगडावरून जाहीर करणार असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणा संदर्भात महाविकास आघाडी अपयशी ठरल्यानं केंद्राकडे बोट दाखवले जात आहे. स्वत:च अपयश झाकण्यासाठी आघाडीचा वेळ खर्ची पडत आहे. सरकारमधील मंत्री जे वक्तव्य करताहेत यावरून सरकारचा हेतू प्रामाणिक दिसत नाही, असं म्हणत विखे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा-  तौक्ते चक्रीवादळाचा फटका, पालघरमध्ये अडकलं 'ते' जहाज

सकल मराठा समाजाने एका व्यासपीठावर एकत्र यावे. एकत्रित येऊन सरकारवर दबाव आणून आरक्षण आपल्या पदरात पाडून घ्यावे लागेल अस मत विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. तसंच संभाजीराजेंनी नवीन पक्ष काढावा हा त्यांचा प्रश्न आहे. आत्तापर्यंत मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या बाजूने आपली भूमिका उभी ‌केलेली नाही. सर्वांनी एकत्र येऊन भूमिका घ्यावी असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारने घोषणाबाज सरकार म्हणून लौकीक मिळवला असल्याची टीका ही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

संभाजी पाटील निलंगेकरांचा संभाजीराजेंना पाठिंबा

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संभाजीराजे घेतील त्या भूमिकेला आमचा पाठिंबा राहील असं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते. तर राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या मागणीकडे डोळेझाक केली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा- या वीरपत्नीला सलाम! लेफ्टनंट ''निकिता कौल धौंडियाल'', भारतीय सैन्यात

एकीकडे नारायण राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे छत्रपती संभाजीराजे हे सत्ताधाऱ्यांची भेट घेण्यावरून टीका करत असले तरी राणे आणि चंद्रकांत पाटील यांचं स्टेटमेंट मी ऐकलं नसल्याचं निलंगेकर यांनी म्हटलं आहे. पण मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही राजेंनी मांडलेली भूमिका योग्यच असल्याचं निलंगेकर म्हणालेत. राजेंनी मराठा समाजाच्या हितासाठी घेतलेल्या प्रत्येक भूमिकेला आमचा पाठिंबा असेल असंही निलंगेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: Maratha reservation, Sambhajiraje chhatrapati