मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नितेश राणेंना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी थेट विधान भवनात लावली फिल्डिंग, अटकेची टांगती तलवार

नितेश राणेंना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी थेट विधान भवनात लावली फिल्डिंग, अटकेची टांगती तलवार

पीए राकेश परब आणि राणे समर्थक पॅनलचे उमेदवार मनीष दळवी यांना सिंधुदूर्ग पोलीस कोणत्याही क्षणी करण्याची शक्यता आहे,

पीए राकेश परब आणि राणे समर्थक पॅनलचे उमेदवार मनीष दळवी यांना सिंधुदूर्ग पोलीस कोणत्याही क्षणी करण्याची शक्यता आहे,

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठोपाठ भाजप आमदार नीतेश राणे यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे.

सिंधुदुर्ग, 27 डिसेंबर: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg District) शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांची कणकवली पोलिसांनी दोन वेळा चौकशी केली. त्यानंतर संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. सचिन सातपुतेच्या चौकशी नंतर शिवसेनेनं या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार भाजप आमदार नितेश राणे यांनाही अटक करण्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली आहे. त्यामुळे आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठोपाठ भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे.

पोलिसांनी या तीन ठिकाणी लावली फिल्डिंग

भाजप आमदार नितेश राणे यांना काल तिसऱ्यांदा चौकशीसाठी कणकवली पोलिसांनी बोलावलं होतं. मात्र नितेश राणे चौकशीला आले नाहीत. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांच्या घरीही सिंधुदुर्ग पोलीस गेले. मात्र तिथेही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे नितेश राणे यांच्या चौकशीसाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी गोव्यातही फिल्डींग लावल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

हेही वाचा- मुलावर होत असलेल्या आरोपांमुळे संतापले नारायण राणे, सरकारला दिला इशारा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चार्टर्ड विमानातून नितेश राणे दिल्लीला जाऊ शकतात त्यामुळे पोलिसांना गोवा विमानतळाशी संपर्क साधून तिथेही फिल्डींग लावल्याची माहिती मिळतेय. आज मुंबईत विधान भवनात नितेश राणे उपस्थित राहिले तर मुंबई पोलिसांच्या मदतीने नितेश राणे यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतला जाऊ शकतं अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठोपाठ आता नितेश राणे यांनाही अटक होणार का...? याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय.

शिवसैनिकावर हल्ला प्रकरणात मला अडकवण्याचा डाव, नितेश राणेंचा आरोप

कणकवलीत शिवसैनिक संतोष परब प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या हल्ल्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीचे नेते मला गोवण्याचा डाव रचला आहे, असा आरोप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. सिंधुदुर्ग बँक निवडणुकीच्या निमित्ताने कणकवलीमध्ये राजकीय वातावरण ढवळून गेले आहे. संतोष परब या शिवसैनिकावर हल्ला झाल्यामुळे नितेश राणे यांना दोन वेळा पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागली. आता नितेश राणे यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला आहे.

'सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजप प्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मतदारांकडून उत्साहवर्धक वातावरण आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते मला संतोष परब हल्ल्यातील केसमध्ये गुंतवत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या या हल्ल्याबाबत सुरू असलेल्या चौकशीवरून मला या गुन्ह्यात अडकवत असल्याचे दिसून येत आहे' असा दावाच राणेंनी केला आहे. तसंच, ज्याप्रमाणे मागील 2 वर्षे विरोधी पक्षाच्या नेत्यांवर चुकीच्या केस टाकल्या जात आहेत तसाच अनुभव मलाही सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत येत असल्याचे नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Nitesh rane