Home /News /maharashtra /

अज्ञातवासात असलेले नितेश राणे वैभववाडीत अवतरले, कार्यकर्त्यांना भेटले, LIVE VIDEO

अज्ञातवासात असलेले नितेश राणे वैभववाडीत अवतरले, कार्यकर्त्यांना भेटले, LIVE VIDEO

गेल्या अनेक दिवसांपासून अज्ञातवासात असलेले नितेश राणे आज पुन्हा एकदा अवतरले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अज्ञातवासात असलेले नितेश राणे आज पुन्हा एकदा अवतरले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अज्ञातवासात असलेले नितेश राणे आज पुन्हा एकदा अवतरले आहे.

    वैभववाडी, 18 जानेवारी : शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ला प्रकरणी (shivsena worker santosh parab attack case) भाजपचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (mumbai high court) जामीन नाकारला आहे. पण, अशातच आज नितेश राणे जिल्ह्यात निवडणुकीच्या रिंगणात दिसले.  राणेंनी वैभवाडीमध्ये कार्यकर्तांना भेटताना दिसून आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अज्ञातवासात असलेले नितेश राणे आज पुन्हा एकदा अवतरले आहे. राणे आज वैभववाडी व देवगडात कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेताना दिसले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग, कुडाळ,वैभववाडी व देवगड या चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होत आहेत. त्यातील वैभववाडी व देवगड या नगरपंचायत आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघातील असल्याने राणे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. अटकपूर्व जामीन होईपर्यंत सार्वजनिक ठिकाणी न दिसणारे आमदार आज मात्र वैभववाडी व देवगडमध्ये फिरताना दिसत होते. दोन्ही शहरातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांनी निवडणुकीचा आढावा घेतला. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणेंना हायकोर्टानं दणका दिला आहे. नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं नाकारला. मात्र मनिष दळवींना हायकोर्टाकडनं अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Network18 ची रेकॉर्डब्रेक कामगिरी, गेल्या तिमाहीत मोडले कमाईचे सर्व विक्रम) याआधी सिंधुदुर्ग सेशन कोर्टाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. राज्य सरकारने नितेश राणे यांना अटक करणार नाही, अशी हमी कोर्टात दिली आहे. पण, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यामुळे नितेश राणेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. काय आहे प्रकरण? शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्याचा कट रचण्यात आमदार नितेश राणे यांचा सहभाग होता, असा आरोप परब यांनी केला आहे. या हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश राणे यांच्यापर्यंत कसे पोहोचतात, याचे पुरावे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात सादर केले होते. त्यामध्ये काही कॉल डिटेल्सचाही समावेश होता. त्याची खातरजमा करण्यासाठी नितेश राणे यांचा फोन जप्त करणं गरजेचं आहे, असा युक्तीवाद त्यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी नितेश राणे अटकेत आहे, असा दावा सरकारी वकिलांनी केला होता.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या