अजित पवारांच्या मोठ्या निर्णयावर नितेश राणेंची सडकून टीका, म्हणाले...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

  • Share this:

मुंबई, 31 मार्च : राज्य आणि देशातील कोरोनाचं संकट गडद होत असल्याचं पाहून सरकारकडून लॉकडाऊची घोषणा करण्यात आली आहे. गर्दी टाळून कोरोना संसर्ग थांबवता येऊ शकते, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयामुळे आर्थिक कोंडीही होत आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयावर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी घणाघाती टीका केली आहे.

जी माणसं आपला जीव धोक्यात घालून त्यांचं वेतन कापू नका, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. तसंच आमदारांचं 100 टक्के मानधन घ्या, पण सरकारी कर्मचा-यांचं वेतन कापू नका, असंही नितेश राणे म्हणाले. त्यामुळे वेतन कपातीवरून भाजपकडून सरकारला आगामी काळातही लक्ष्य केलं जाण्याची शक्यता आहे.

काय आहे राज्य सरकारचा निर्णय?

राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करुन त्यांना 40 टक्के वेतन देण्यात येणार आहे. राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा- दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा, 25 रुपयांच्या दराने होणार 10 लाख लीटर दुधाची खरेदी

‘कोरोना’चं संकट आणि ‘टाळाबंदी’मुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन तसेच ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे तसेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच राज्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी या निर्णयाला पाठिंबा, सहकार्य देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2020 04:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading