मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नवाब मलिकांच्या आरोपाचं भाजप आमदाराने केलं खंडन, 'तो' किरण गोसावी दुसराच?

नवाब मलिकांच्या आरोपाचं भाजप आमदाराने केलं खंडन, 'तो' किरण गोसावी दुसराच?

ठाण्यातील एका भाजप आमदाराच्या कंपनीत आरोपी किरण गोसावीची भागीदारी असल्याचा आरोप केला होता

ठाण्यातील एका भाजप आमदाराच्या कंपनीत आरोपी किरण गोसावीची भागीदारी असल्याचा आरोप केला होता

ठाण्यातील एका भाजप आमदाराच्या कंपनीत आरोपी किरण गोसावीची भागीदारी असल्याचा आरोप केला होता.

ठाणे, 30 ऑक्टोबर : आर्यन खान अटक प्रकरणी (aryan khan arrest case) राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी आरोपांचा धुरळा उडवला होता. एवढंच नाहीतर आरोपी किरण गोसावी याची भाजपच्या आमदाराच्या कंपनीत भागीदारी असल्याचा आरोप केला होता. पण, भाजपचे आमदार निरंजन डावखरेंनी (BJP MLA Niranjan Davkhare) सर्व आरोप फेटाळून लावले असून हा किरण गोसावी वेगळा असल्याचा खुलासा केला आहे. नवाब मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. तसंच ठाण्यातील एका भाजप आमदाराच्या कंपनीत आरोपी किरण गोसावीची भागीदारी असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा हिवाळी अधिवेशनात खुलासा करणार असल्याचा दावा केला होता. "पगार कमी, उच्च शिक्षण घेता येत नाही" ST कर्मचाऱ्याच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल त्यांच्या आरोपावर भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी खुलासा केला आहे. मलिक यांनी ज्या किरण गोसावीच्या नावाने आरोप केला आहे. तो हा वेगळा किरण गोसावी असल्याचे समोर येत आहे. ठाण्याचे भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांची व्यावसायिक भागीदारी एका किरण गोसावी नावाच्या व्यक्तीशी आहे मात्र तो किरण गोसावी हा वेगळा असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. VIDEO: अफगाणिस्तानच्या कॅप्टनला विचारला तालिबानवर प्रश्न, पाहा नबीचं उत्तर दरम्यान, नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा आर्यन खान अटक प्रकरणावरून भाजप आणि एनसीबीवर जोरदार निशाणा साधला. 'समीर वानखेडे यांनी ज्या काही केसेस केल्या. त्याची संख्या बघा दोन ग्रॅम ,चार ग्रॅम, पाच ग्रॅम आहे. एका केसमध्ये 30 सेलिब्रिटींना बोलवले मात्र कुठलीही अटक नाही. हे सगळं खंडणीसाठी केले. भाजपच एक मोठ्या नेत्याचा जवळचा माणूस रोज तिकडे जातो. मी विधिमंडळात याबाबत पटलावर ठेवले आहे, असं मलिक यांनी सांगितलं.
First published:

पुढील बातम्या