मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजप आमदाराचं अनोखं स्टिंग ऑपरेशन, पोलिसांच्या वसुलीचा पर्दाफाश

भाजप आमदाराचं अनोखं स्टिंग ऑपरेशन, पोलिसांच्या वसुलीचा पर्दाफाश

कन्नड-चाळीसगाव घाटात ट्रॅफिक पोलिसांच्या (Traffic Police) वसुलीचा भाजप आमदार मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) यांनी पर्दाफाश केला आहे.

कन्नड-चाळीसगाव घाटात ट्रॅफिक पोलिसांच्या (Traffic Police) वसुलीचा भाजप आमदार मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) यांनी पर्दाफाश केला आहे.

कन्नड-चाळीसगाव घाटात ट्रॅफिक पोलिसांच्या (Traffic Police) वसुलीचा भाजप आमदार मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) यांनी पर्दाफाश केला आहे.

औरंगाबाद, 25 नोव्हेंबर : कन्नड-चाळीसगाव घाटात ट्रॅफिक पोलिसांच्या (Traffic Police) वसुलीचा भाजप आमदार मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) यांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे ट्रक ड्रायव्हर बनून मंगेश चव्हाण यांनी स्वत: पोलिसांच्या वसुलीचं स्टिंग ऑपरेशन (Sting Operation) केलं आहे. प्रतिगाडी 500 रुपये वसुली करणारे पोलीस आणि झिरो पोलीस कॅमेऱ्यात कैद (Captured in Camera) झाले आहेत. खरंतर अक्रम घाट धोकादायक झाल्यामुळे अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पण वाहतूक पोलीस पैसे घेऊन अवजड वाहने घाटातून सोडत आहेत. पोलिसांचा हा वसुलीचा धंद्या भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी उघड केला आहे.

"दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना प्रवेश बंद असलेल्या कन्नड घाटात पोलिसांकडून 500 ते 100 रुपये प्रति अवजड वाहन घेऊन त्यांना सोडण्यात येते. यामुळे अनेकदा घाट जाम होऊन 5 ते 10 तास घाट जाम होतो. गंभीर रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका तासंतास अडकून पडतात. यामुळे पूर्ण राज्यात चाळीसगाव तालुक्याचे नाव खराब होत आहे. केवळ वसुलीसाठी प्रवाशांच्या जीवाशी सुरु असलेल्या खेळाचा स्टिंग ऑपरेशन करत पर्दाफाश केला", असं मंगेश चव्हाण यांनी फेसबुकवर लिहिलं आहे.

स्टिंग ऑपरेशन कसं केलं?

"महावसुली आघाडी सरकारच्या आशिर्वादाने चाळीसगाव तालुक्यातील अवजड वाहनांसाठी बंद असलेल्या कन्नड घाटात पोलीस ट्रक चालकांकडून कशाप्रकारे पैसे वसुली करतात याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. याची खातरजमा करण्यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांसह काल रात्री वेषांतर करत स्टिंग ऑपरेशन केले. यावेळी मी स्वतः अजवड ट्रक चालवत कन्नड घाटात नेला असता त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी माझ्याकडे जाताना व येताना 500 रुपयांची मागणी केली. त्यांना मी यात थोडे कमी करा, असं सांगत 500 रुपये पोलिसांच्या हातात दिले व बाकी पैसे परत मागितले असता सदर पोलिसाने ते देण्यास नकार दिला. नंतर मी बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना जवळ बोलावले व हा बाकी पैसे परत देत नसल्याचे सांगितले. तेव्हा त्यातील एक पोलीस शिवीगाळ करायला लागला. मग मीदेखील पोलिसांची मग्रुरी पाहून खाली उतरुन पोलिसांशी बोलायला सुरुवात करताच काही पोलिसांनी मला ओळखले व त्यांनी पळ काढला", असं मंगेश चव्हाण यांनी सांगितलं.

मंगेश चव्हाण यांनी फेसबुकवर त्यांच्या स्टिंग ऑपरेशनचे व्हिडीओ शेअर केले आहेत. तसेच पोलिसांकडून कशाप्रकारे गैरकायदेशीरपणेे अवजड वाहनांना घाटात सोडलं जातं, याची माहिती दिली. चव्हाण यांनी शेअर केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहेत.

'आरोपींवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल'

"आमदारांनी जे स्टिंग ऑपरेशन केलं त्याचा व्हिडीओ आमच्याकडेही आला आहे. त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात जे कुणी दोषी असतील तर सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल. प्राथमिक माहितीनुसार काही खासगी इसम पैसे घेत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामागेही काही पोलीस कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत जो अहवास समोर येईल त्यावरुन शिस्तभंगाची कारवाई केली जाईल", अशी माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी दिली.

First published: