अमोल कोल्हेंविरोधातील लढाईत शिवसेनेला बळ देणारा भाजप आमदार नाराज?

अमोल कोल्हेंविरोधातील लढाईत शिवसेनेला बळ देणारा भाजप आमदार नाराज?

भाजपच्या पश्चिम महाराष्ट्राच्या विजय संकल्प मेळाव्याला दांडी मारली आहे.

  • Share this:

पुणे, 23 सप्टेंबर : भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या पश्चिम महाराष्ट्राच्या विजय संकल्प मेळाव्याला दांडी मारली आहे. उदयनराजेंच्या या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. त्याचवेळी भोसरी मतदारसंघातील भाजप आमदार महेश लांडगे हेदेखील या मेळाव्याला गैरहजर राहिल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघ राज्यभर चर्चेत होता. कारण या मतदारसंघातून सलग तीन वेळा शिवसेनेकडून खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना अभिनेते अमोल कोल्हे यांनी आव्हान दिलं होतं. या निवडणुकीत आढळराव पाटलांना अनेक मतदारसंघात फटका बसला. मात्र भोसरी मतदारसंघातून त्यांना मोठं मताधिक्य मिळालं. यामागे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा सिंहाचा वाटा होता.

महेश लांडगे नाराज?

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघात जागावाटपारून युतीत संघर्ष होण्याची शक्यता आहे. भोसरीतही हा संघर्ष निर्माण झाला आहे. कारण ही जागा युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच विद्यमान आमदार महेश लांडगे नाराज असल्याची मतदारसंघात चर्चा आहे. त्यातच भाजपच्या कार्यकारी अध्यक्षांचा पुण्यात मेळावा सुरू असताना लांडगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांची स्वतंत्र बैठक घेतली. त्यामुळे विधानसभेत महेश लांडगे बंडखोरी करणार का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

उदयनराजेंनी भाजपला दिलं पहिलं सरप्राईज

भाजपच्या मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांची झाडून हजेरी होती. सगळे खासदार आणि 52 विधानसभा मतदार संघाचे पदाधिकारीही हजर होते. मात्र उदयनराजे भोसले यांची अनुपस्थिती मेळाव्यात चर्चेचा विषय होता.

उदयनराजे भोसले हे आपल्या हटके स्टाईल आणि बेधडकपणासाठी ओळखले जातात. राष्ट्रवादीत असताना त्यांनी अनेकवेळा पक्षनेतृत्वावरच जाहीररीत्या तोफ डागली होती. तसंच अनेकवेळा त्यांनी पक्षशिस्तीचा भंग केल्याचाही आरोप त्यांच्यावर झाला. अशातच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष घेत असलेल्या मेळाव्यालाच ते गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे उदयनराजेंनी भाजपला हे पहिलं सरप्राईज दिलं आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

VIDEO : नॅशनल हायवेवर तरुण करत होता असे भयंकर स्टंट; आता पोलीस घेतायत शोध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 09:02 PM IST

ताज्या बातम्या