भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात, तरुण-तरुणी ठार

भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात, तरुण-तरुणी ठार

तर या अपघातात आमदार कथोरे जखमी झाले आहेत. कथोरे यांच्यावर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • Share this:

कल्याण, 14 डिसेंबर : भाजपचे (BJP) मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) यांच्या कारला भीषण अपघात झाला होता. भरधाव दुचाकीने कथोरे यांच्या कारला धडक दिली होती.  या  अपघातातून आमदार किसन कथोरे बचावले आहे. परंतु, या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला.

कल्याण तालुक्यातील दहागावजवळ रविवारी रात्री ही घटना घडली होती.  भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गाडीने एका दुचाकीला समोरून जोरात धडक दिली होती. भरधाव वेगात असल्यामुळे दोन्ही वाहनांनी समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, कथोरे यांच्या कारची एअर बॅग सुद्धा फुटली. कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. यात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

वस्ताद गेले, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन

अमित नंदकुमार सिंग असं या तरुणाचे नाव आहे. तर त्याच्यासोबर सिमरन सिंग नावाची तरुणी गंभीर जखमी झाली होती. दोघेही जण कल्याण ग्रामीणमधील पिसवली परिसरातील रहिवासी होते. जखमी अवस्थेत तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, रात्री उशिरा उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला. तर या अपघातात आमदार कथोरे जखमी झाले आहेत. कथोरे यांच्यावर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोना काळात देशात स्मार्टफोनचा वापर वाढला; भारतीय रोज सरासरी इतका वेळ घालवतात

आमदार किसन कथोरे हे टिटवाळा येथून एक कार्यक्रम आटपून पुन्हा बदलापूरच्या दिशेने येत असताना दहागांव वाहुली गावाजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीची आणि आमदारांच्या वाहनाची धडक झाली. त्यामुळे हा अपघात झाला होता.  दरम्यान, लोकप्रतिनिधींच्या गाडीला अपघात झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मित्राचा लग्नसोहळा आटोपून घरी परतणाऱ्या 4 मित्रांवर काळाचा घाला

दरम्यान, मित्राचा विवाह सोहळा आटोपून गावी परतणाऱ्या रिक्षाला हायवा ट्रकने जोरात धडक दिली. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बीड जिल्ह्यातील  गंगाखेड-परळी मार्गावर करम गावाजवळ  घडली. अंबाजोगाई येथील दत्ता सोळंके, आकाश चौधरी, विशाल बागवाले हे  रिक्षा चालक मुकुंद म्हस्के याच्यासोबत सोनपेठ तालुक्यातील चुकार पिंपरी इथं मित्राच्या लग्नाला गेले होते. मित्राचे लग्न आटोपून चौघेजण अंबोजोगाईकडे परतत होते.

परळी महामार्गावरील करम गावाजवळ पोहोचले असता राखेची वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवा ट्रकने रिक्षाला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, रिक्षाचा चेंदामेंदा झाला. त्यामुळे घटनास्थळावरच चौघांचा जागीच मृत्यू झाला.  दत्ता सोळंके, आकाश चौधरी, विशाल बागवाले आणि रिक्षा चालक मुकुंद म्हस्के हे चारही तरुण अंबाजोगाई येथील रायगडनगर इथं राहत होते. त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजता कुटुंबावर आणि रायगडनगरवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Published by: sachin Salve
First published: December 14, 2020, 10:33 AM IST
Tags:

ताज्या बातम्या