Home /News /maharashtra /

भाजपला धक्का! पंढरपूरचा बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर, शरद पवारांसोबत गाडीतून केला प्रवास

भाजपला धक्का! पंढरपूरचा बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर, शरद पवारांसोबत गाडीतून केला प्रवास

आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेवून राष्ट्रवादीची पुनर्बांधणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

पंढरपूर, 18 डिसेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे शरद पवार आणि सोलापूरचे भाजप नेते कल्याणराव काळे (BJP MLA Kalyanrao kale) एकाच व्यासपीठावर एकत्र आले. एवढंच नाही तर कल्याणराव काळे यांनी शरद पवार यांच्या गाडीतून सरकोली ते पंढरपूर असा प्रवासही केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. भाजप नेते कल्याणराव काळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हेही वाचा...यानंतरचे सर्व मोर्चे रद्द, ओबीसी नेते समीर भुजबळ यांची मोठी घोषणा कल्याणराव काळे हे शरद पवारांच्या गाडीतून सरकोलीतील दिवंगत आमदार भारत भालके यांच्या घरी दाखल झाल्याचं पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांनी आपल्या भाषणात कल्याण काळे यांचा आवर्जुन उल्लेख केला. एवढंच काय तर यापुढे शरद पवार सांगतील त्या पद्धतीनं आपण काम करू, असंही कल्याणराव काळे यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. काळे यांच्या या वक्तव्यानंतर ते लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. एकूणात या सगळ्या प्रकारामुळे राज्यात राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेवून राष्ट्रवादीची पुनर्बांधणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनेक भाजप नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा दावा केला होता. काय म्हणाले शरद पवार...? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे निधनानंतर आज शरद पवार यांनी सरकोली या गावी येऊन भालके यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. आमदार भालके यांना पाणी प्रश्न आणि सहकाराची जाण होती. त्या क्षेत्रातील त्यांचे काम विसरता येणार नाही. विठ्ठल साखर कारखाना सुरू करण्यासाठी त्यांची धडपड होती. यामुळे त्यांचे आजाराकडे दुर्लक्ष झाले. आज भालके आपल्यात नाहीत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या स्थितीवर सुद्धा शरद पवारांनी बोट ठेवलं. दरम्यान, शरद पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराने काम करणाऱ्या सर्वच नेत्यांना यापुढे एकत्र काम करणयाचे आवाहन केलं. जुन्या सहकार्याना एकत्र आणण्यासाठी पवार सरसावले आहेत. हेही वाचा...पंतप्रधानांचं कार्यालयच OLX वर विक्रीला टाकलं, 4 जण ताब्यात पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार म्हणून पवार नाव घोषित करतील, अशी अपेक्षा जनतेला होती. पण पवारानी आपल्या शैलीत याबाबत काहीही स्पष्ट भाष्य न करता, सर्वांनी एकत्र काम करण्याची सूचना केली. त्यामुळे भालके यांच्या जागी कोण उमेदवार असेल हे आता वेळ आल्यावरच कळेल.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: BJP, Maharashtra, NCP, Sharad pawar

पुढील बातम्या