भाजपच्या केंद्र सरकारमधील नेतृत्वावर राष्ट्रवादीचे नेते टीका करत असतात. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काम करते. त्यांच्या पक्षाचे चार खासदार असून त्यांना लोकनेते म्हटले जात आहे. त्यामुळे ज्या पक्षाचे 303 खासदार आहे, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला काय म्हणणार? असा सवाल पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारला आहे. तसंच, 'जनतेचा विश्वासघात करून हे सरकार आले आहे. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये आम्हाला अडवणारे कुणीही नाही असा त्यांचा हा गैरसमज झाला आहे' अशी टीकाही त्यांनी केली. पवारांवरील टीकेचा विषय संपला - फडणवीस दरम्यान, 'चंद्रकांत पाटील जे काही बोलले होते, त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार यांच्या विधानाचे विपर्यास केले गेले, असं त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपला आहे' असं भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, 'ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा ज्येष्ठ नेते आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सुद्धा त्यांच्याबद्दल बोलत असता. त्यावेळेस त्यांना काही वाटत नाही. पण, त्यामुळे दुसऱ्या नेत्याकडे आपण जर बोट करत असाल तर चार बोटं आपल्याकडे हे लक्षात ठेवा',असा सल्लावजा टोलाही फडणवीस यांनी लगावला.4 खासदार असणारे जर लोकनेते होत असतील तर 303 खासदार असणाऱ्या मोदी यांच्या नेतृत्वला काय म्हणाले पाहिजे : आमदार गोपीचंद पडळकर pic.twitter.com/38kl0vuWMs
— News18Lokmat (@News18lokmat) November 23, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: सांगली