मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ओबीसी नेत्याचं माकड झालंय, गोपीचंद पडळकरांची विखारी टीका

ओबीसी नेत्याचं माकड झालंय, गोपीचंद पडळकरांची विखारी टीका

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे इथं गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यत आयोजित केली होती.

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे इथं गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यत आयोजित केली होती.

'ठाकरे सरकारमधील ओबीसी नेते हे काका पुतण्याच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत आणि ओबीसी नेत्याचे माकड झाले आहे'

सांगली, 24 जून: स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी आरक्षण (OBC reservation) रद्द झाल्यामुळे भाजप (BJP) आक्रमक झाली आहे. महाविकास आघाडी सरकार (MVA Government) आणि भाजपचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. यावादात आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उडी घेतली असून  'ओबीसी नेते हे काका पुतण्याच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत आणि ओबीसी नेत्याचे माकड झाले आहे' अशी विखारी टीका केली आहे.

सांगलीत पत्रकारांशी बोलत असताना गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेत्यांवर जहरी टीका केली आहे.

'ठाकरे सरकारमधील ओबीसी नेते हे काका पुतण्याच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत आणि ओबीसी नेत्याचे माकड झाले आहे. या ओबीसी मंत्र्याच्या शब्दांला कवडीची किंमत राहिली नाही' अशी जहरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

देशात डेल्टा+ व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार?, तज्ज्ञांची मोठी माहिती

ओबीसी आरक्षणाचा तसंच ओबीसी समाजाला दगाफटका करणाऱ्या महाविकास आघाडीला देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर देत आहे. महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या या निवडणुका मध्ये सर्व जागेवर ओबीसीचे उमेदवार उभे केले जातील असे जाहीर केले आहे. फडणवीस यांचे आभारी आहे. त्याच्या पाठीमागे सर्व ओबीसी समाज राहील, असं म्हणत पडळकर यांनी फडणवीस यांचं तोंडभरून कौतुक केलं.

AC मध्ये 1 ते 5 स्टार रेटिंग काय असतं? एसी घेताना समजून घ्या हे गणित, होईल फायदा

'जो पर्यंत ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार नाहीत. अशी भीम गर्जना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या निवडणूक जाहीर झाल्या. या ओबीसी नेत्याच्या शब्दाला मातीमोल किंमत या आघाडी सरकारने केली आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असंही पडळकर म्हणाले.

'ओबीसी नेते मलिदा खाण्यासाठी सत्तेमध्ये आहेत का, त्यांनी आत्मसन्मान विकला आहे का? या सर्व प्रश्नावर महाराष्ट्रामधील ओबीसी समाज जागृत झाला आहे. येत्या 26 तारखेला ओबीसी समाज आपली ताकत दाखवत या सरकारला जागा दाखवणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले.

First published:

Tags: BJP, Maharashtra, Mumbai, ओबीसी OBC