मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'सुप्रिया सुळेंना वाटतं त्यांचे वडीलच राज्याच्या राजकारणात..', गोपीचंद पडळकरांचा निशाणा

'सुप्रिया सुळेंना वाटतं त्यांचे वडीलच राज्याच्या राजकारणात..', गोपीचंद पडळकरांचा निशाणा

अजित पवार यांनी भाजपसोबत सरकार बनवले होते तेव्हा त्यांच्यामागे 2 आमदार राहिले नाहीत.

अजित पवार यांनी भाजपसोबत सरकार बनवले होते तेव्हा त्यांच्यामागे 2 आमदार राहिले नाहीत.

अजित पवार यांनी भाजपसोबत सरकार बनवले होते तेव्हा त्यांच्यामागे 2 आमदार राहिले नाहीत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 5 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना असे वाटते की त्यांचे वडील शरद पवारसाहेबच राज्याच्या राजकारणात बदल करू शकतात, या शब्दात भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरावरुन त्यांनी हे वक्तव्य केले.

राज्यात जून महिन्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला. यानंतर शिंदे गट आणि भाजपने राज्यात सत्ता मिळवली. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

शिंदे मुख्यमंत्री झाले हे सुप्रिया सुळेंना पटले नाही -

यावरुनच गोपीचंद पडळकर म्हणाले की, सुप्रिया सुळेंना वाटते की, त्यांचे वडीलच केवळ राज्याच्या राजकारणात बदल करु शकतात. मात्र, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या या समजाला छेद दिला आहे. मात्र, एका सर्वसामान्य माणसाला भाजपने संधी दिली आहे. एकनाथ शिंदेंसारख्या नेत्यांला मुख्यमंत्री केले आहे. हे सुप्रिया ताईंना पटलेलं नाही.

हेही वाचा - ज्या उत्साहाने आमचं सरकार पाडलं....; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार टीका

अजित पवार यांनी भाजपसोबत सरकार बनवले होते तेव्हा त्यांच्यामागे 2 आमदार राहिले नाहीत. आता एकनाथ शिंदेंच्या मागे 50 आमदार आहेत. हे सुप्रिया सुळेंना रुचलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखतंय, अशी टिका पडळकरांनी केली. गणपतीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही लोकांच्या घरी जात आहेत. मात्र, याचाही त्यांना त्रास होतोय. वाईट वाटतंय. हे सगळं द्वेषातून होतंय, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

काल सुप्रिया सुळेंनी केली होती टीका -

राज्याला मागच्या अडीच महिन्यापासून पालकमंत्री नाही. त्यामुळे लोकांना कुठे तक्रार करावी हेच कळत नाही, असेही त्या यावेळी म्हणाल्या. तसेच मी गेल्या काही दिवसांपासून मंत्र्यांची वेळ मागत आहे. मात्र, मला वेळ मिळत नाही. त्यांना सर्वसामान्य लोकांची सेवा करायची नसेल. पण मंत्री फक्त कुणाच्या तरी घरी दिसत आहेत. फक्त गाठीभेटी होत आहेत. तसेच एक किलोमीटरच्या आतचा दौरा करत आहेत. हे नवलच आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी काल केली होती.

First published:

Tags: Gopichand padalkar, Maharashtra politics, Sharad Pawar, Supriya sule