या वेळी मोर्चात सहभागी काही आंदोलक व पडळकर समर्थकांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. आंदोलकांनी आमदार पडळकर यांची वाट न पाहता आपल्या मागण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आंदोलन सुरू असताना पडळकर मात्र, भाजप कार्यालयात व्यस्त होते. दरम्यान, राजकीय लोकांना समाजामध्ये चळवळीमध्ये भाग घेण्यास विरोध आहे. त्यामुळे राजकीय लोकांना बाजूला ठेवून आम्ही चळवळ उभा करत आहोत. अनेकांनी आजपर्यंत समाजाला फसवलं आहे, असा आरोप यावेळी आंदोलक सुरेश कांबळे यांनी केला. हाथरस घटनेच्या निषेधासाठी जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी मात्र, 'कुणाची भूमिका काय आहे. याबद्दल मला उत्तर द्यायचे नाही. मी समाजाचा कार्यकर्ता आहे. मी राज्यभर फिरत राहणार, भाजपाचा पदाधिकारी म्हणून मी इथं उपस्थित नाही', असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.#उस्मानाबाद : धनगर समाजाचा मोर्चा, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या येण्यावरून पेटला वाद pic.twitter.com/SyOI327CoJ
— News18Lokmat (@News18lokmat) October 6, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.