सांगली, 25 मे: राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटलेला असताना आता भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलन सुरू करण्याची तयारी केली आहे. धनगर आरक्षणाचा (dhangar reservation) जागर करण्यासाठी गोपीचंद पडळकर चक्क धनगरी वेशातून समाजाला आवाहन केले आहे.
येत्या 31 मे रोजी देशातील समस्त बहुजनांच्या प्रेरणास्त्रोत माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून धनगरी वेशात ही जयंती साजरी करत धनगर आरक्षणचा जागर करून या महाविकास आघाडीला आपली ताकद दाखवून देण्याचे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी समस्त धनगर समाजाला केले आहे.
कोरोनाची तिसरी लाट खरंच लहान मुलांसाठी घातक?आरोग्य मंत्रालयाच्या उत्तरानं दिलासा
'धनगर आरक्षणाचा निर्धार मनाशी पक्का करायचा आहे. यंदा कोविडमुळे जयंती मोठ्या स्वरूपात साजरी करता येणार नाही. परंतु आपल्या घरातूनच सर्वांनी आपल्या धनगरी पोशाखात अहिल्यामातेला वंदन करून जयंती उत्सव साजरा करायचा आहे, असं आवाहनही पडळकर यांनी केले आहे.
Twitter, Facebook बंद होणार? संपतेय सरकारने जारी केलेली ही डेडलाइन
तसंच, 'चौंडी येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना वंदन करताना फेसबुक लाईव्हद्वारे आपण धनगर समाजाला संवाद साधणार आहे. त्यावेळी कमेंटमध्ये आपले पारंपारिक पोशाखातील फोटो टाकून आपली ताकद दाखवन्याचे आव्हान पडळकर यांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.