भाजपला घरचा आहेर..आमदार सुनील देशमुखांची साध्वी प्रज्ञासिंह विरोधात पोस्ट

सुनील देशमुख यांनी त्यांनी 'फेसबुक'वर साध्वी प्रज्ञासिंग यांच्या विरोधात एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी साध्वी यांच्या वक्तव्याची पक्षाने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली. यामुळे साध्वी प्रकरणावरून भाजपला घरचा आहेर मिळाला, अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे.

संजय शेंडे संजय शेंडे | News18 Lokmat | Updated On: Apr 20, 2019 03:47 PM IST

भाजपला घरचा आहेर..आमदार सुनील देशमुखांची साध्वी प्रज्ञासिंह विरोधात पोस्ट

अमरावती, २० एप्रिल- मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी ATS प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबत जे वक्तव्य केले त्याचा देशभरातून विरोध होत आहे. त्यात अमरावतीचे भाजप आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

सुनील देशमुख यांनी त्यांनी 'फेसबुक'वर साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधात एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी साध्वी यांच्या वक्तव्याची पक्षाने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली. यामुळे साध्वी प्रकरणावरून भाजपला घरचा आहेर मिळाला, अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. डॉ सुनील देशमुख यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

काय म्हणाल्या, साध्वी प्रज्ञासिंह

'हेमंत करकरे यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांना माझा शाप भोवला, असे साध्वी म्हणाल्या. मी तुरुंगात गेल्यानंतर लगेचच सव्वा महिन्यात दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारले, असेही त्यांनी म्हटले आहे.'

साध्वी यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याने त्यांची सुटका करावी, या प्रकरणी तपास करणाऱ्या पथकाने हेमंत करकरेंना विनंती केली होती.  पण आपल्याकडे प्रज्ञासिंह यांच्याविरुद्ध पुरावे आहेत. त्यामुळेच मी त्यांना या खटल्यातून मुक्त करणार नाही, असं हेमंत करकरे म्हणाले होते, याची आठवण साध्वी यांनी करून दिली.'

Loading...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 20, 2019 03:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...