आमदार यशोमतींनी आंदोलनात आणलेले शेतकरी नव्हे गुंड, भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

आमदार यशोमतींनी आंदोलनात आणलेले शेतकरी नव्हे गुंड, भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या तिवसा विधानसभा मतदारसंघात पिण्याच्या पाण्यासाठी अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्याच्या विषयावरून राजकीय वातावरण तापले आहे.

  • Share this:

अमरावती, 16 मे- काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या तिवसा विधानसभा मतदारसंघात पिण्याच्या पाण्यासाठी अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्याच्या विषयावरून राजकीय वातावरण तापले आहे. सोमवारी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी सिंचन विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर यांना शिविगाळ करून चांगलेच खडेबोल सुनावले होते. अपशद्बही वापरले होते. यावर आता मोर्शी-वरुड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आमदार डॉ. बोंडे यांनी

यशोमती ठाकूर यांनी आंदोलनात आणलेल्या शेतकरी व नागरिकांना गुंड संबोधले आहे.

पाणी पुरवठाच्या बैठकीला यशोमती ठाकूर यांनी आणलेले शेतकरी असले तरी ते गुंड होते, असे खळबळजनक वक्तव्य आमदार अनिल बोंडे यांनी केले आहे. पाण्यासाठी आंदोलन करणारे शेतकरी व नागरिकांना गुंडगिरीची भाषा भाजप आमदार अनिल बोंडे करत आहेत. नुकतेच अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्यासाठी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी कार्यकर्ते समवेत अमरावतीच्या सिंचन विभागाच्या कार्यालयात काँग्रेस तिवसा तालुक्याला पाणी मिळावे, या मागणीसाठी संतप्त होत मुख्य अभियंत्यावर चांगल्याच बरसल्या होत्या. यावेळी पाणी पुरवठाच्या बैठकीला चार आमदार आले असताना सोबत गुंड का आणले, असा सवाल अनिल बोंडे यांनी केला आहे. यशोमती ठाकूर यांनी आणलेले इतर लोक शेतकरी नागरिक नाही ते गुंड आहे, असे वक्तव्य आमदार अनिल बोंडे यांनी केले. त्यामुळे परिसरातील शेतकरी व सामान्य नागरिकांमध्ये चांगलाच रोष व्यक्त होत आहे.

यापूर्वी भाजप अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना 'साले' संबोधले होते. आता डॉ. बोंडे यांनी शेतकऱ्यांना गुंड म्हटल्याने जिल्ह्यात आता हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

VIDEO: यशोमती ठाकूर यांचं पाण्यासाठी रौद्र रूप ,मुख्य अभियंत्याला धरले धारेवर

First published: May 16, 2019, 8:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading