मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

..तर उभा गाडीन अन् स्वतः जोडे मारीन; पंचनाम्यावरुन भाजप आमदाराची अधिकाऱ्याला तंबी

..तर उभा गाडीन अन् स्वतः जोडे मारीन; पंचनाम्यावरुन भाजप आमदाराची अधिकाऱ्याला तंबी

वर्धा जिल्ह्यात पावसाने दाणादाण केली आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करायला आलेल्या अधिकाऱ्यांना भाजप आमदाराने चांगलीच तंबी दिली आहे.

  • Published by:  Rahul Punde
वर्धा, 26 जुलै : जिल्ह्यात सगळीकडे पावसाने हाहाकार माजला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लोकप्रतिनिधी पाहणी करत आहे. अशातच आर्वी विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार दादाराव केचे यांनी कारंजा तालुक्यात पाहणी दौरा केला. दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये जे नुकसान झालंय ते दाखवा अन्यथा उभा गाडीन आणि स्वतः जोड्याने मारीन अशी तंबी अधिकाऱ्यांना दिली आहे. तर स्वतः जोड्याने मारीन : भाजप आमदार कारंजा तालुक्यातील पारडी शिवारात भाजप आमदार दादाराव केचे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. दरम्यान काही शेतकऱ्यांनी सिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंता हे शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरीच्या नुकसानिबाबत अहवाल बनविताना भेदभाव करत असल्याचा आरोप केलाय. यावर आमदार दादाराव केचे चांगलेच संतप्त झाले. आमदार केचे यांनी कनिष्ठ अभियंत्याला बोलवत तुम्ही शेतकऱ्यांच्या विहिरी गायब केल्या, तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय करता, आता केला तर उभा गाडीन आणि कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय झाला तर स्वतः जोड्याने मारीन हे लक्षात ठेवा अशी तंबीच दिलीय. Weather Update : सावधान! राज्यात पुढील 3 दिवस वादळी पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून अलर्ट एवढंच नव्हे तर आमदार यांनी तुम्ही शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरीच्या नुकसानीचा अहवाल बनविताना वीस हजार द्या, दहा हजार द्या असं म्हणता आणि ज्यांचे पैशे पोहचले त्यांच्या विहिरी बरोबर दाखविल्या जातात. पण आता असं चालणार नाही. शेतकऱ्यांवर अन्याय नको असे निर्देशही त्यांनी दिल आहेत. जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोकप्रतिनिधींकडूनही पाहणी दौरे करून पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात येत आहे. मात्र, संकटात सापडलेल्या नागरिकांना आता तातडीने मदत मिळावी हीच अपेक्षा आहे.
First published:

Tags: Wardha, Wardha news

पुढील बातम्या