Home /News /maharashtra /

'राज्यकर्त्यांनो... जरा लाजा वाटू द्या', औरंगाबाद दुर्घटनेवरून भाजप आमदाराचा ठाकरे सरकारवर निशाणा

'राज्यकर्त्यांनो... जरा लाजा वाटू द्या', औरंगाबाद दुर्घटनेवरून भाजप आमदाराचा ठाकरे सरकारवर निशाणा

'कोरोणामुळे किती मरतील यापेक्षा सरकारच्या नियोजनाच्या अभावामुळे मोठया प्रमाणत माणसं आपला जीव गमावत आहेत.'

बीड, 08 मे : औरंगाबादजवळील करमाड इथं सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील 16 मजुरांची दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दू:ख व्यक्त केलं. तसंच मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर केली. तसेच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही दिले आहेत. पण यावर विरोधी पक्षाना कठोर शब्दात टीका केली आहे. 'परराज्यात जाणारे लोक हे काही पाकीस्तानी नाहीत. त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवा. कारण कोरोणामुळे किती मरतील यापेक्षा सरकारच्या नियोजनाच्या अभावामुळे मोठया प्रमाणत माणसं आपला जीव गमावत आहेत. हे दुर्देवी आहे. त्यामुळे राज्यकर्त्यां जरा लाजा वाटू द्या' अशा शब्दात भाजप आमदार सुरेश धस यांनी संताप व्यक्त केला आहे. आज औरंगाबाद इथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेत चिरडून मृत्यृमुखी पडलेले 16 नागरिक आहेत. 'ही दुर्दैवी घटना आहे. यांच्या बाबतीत थोडंफार तरी लाज लज्जा शरम काही वाटू द्या' असा घणाघात सुरेश धस यांनी केला आहे. ते बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते. राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढणार का? रात्री 8 वाजता होणार स्पष्ट दरम्यान, औरंगाबादमध्ये झालेली घटना मनाला घर करणारी आहे. या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. 'औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेत मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी आहे. कोरोना महामारीच्या काळातील या अपघाताने केवळ मनाला यातनाच झाल्या नाही तर पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर आले आहेत.', अस शरद पवार यांनी ट्वीट केलं. तसेच असंघटित क्षेत्रातील मजूर सद्यस्थितीत बेरोजगारीच्या भीतीने शहर सोडून जात असेल तर सर्वप्रथम त्याच्या रोजगाराच्या ठिकाणच्या कॉन्ट्रॅक्टर अथवा मालकाने त्यांची काळजी घ्यावी. ते शक्य होत नसल्यास सरकारला कळवावं, असही शरद पवार यांनी म्हटलं आहे. देशातल राज्य सरकारांनीही या स्थलांतरित मजुरांसाठी भरारी पथकांची नियुक्ती करून सातत्याने त्यांचा पाठपुरावा करावा. त्यांच्या गरजांबाबत काळजी घ्यावी. केंद्र व राज्य सरकारांनी एकत्रित येऊन तातडीने दखल घेऊन या प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी विनंती देखील शरद पवार यांनी केली. मोठी बातमी! विद्यापीठाच्या अंतिम वर्षाची परीक्षा वगळता सर्व परीक्षा रद्द दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे झालेला हा रेल्वे अपघात व्यथित करणारा आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी बोललो असून, ते परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आवश्यक सर्व सहकार्य केलं जात आहे, असंही मोदींनी सांगितलं आहे. नरेंद्र मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकणाऱ्याला भाजपनं दिली उमेदवारी, खडसेंचा पारा संपादन - रेणुका धायबर
Published by:Manoj Khandekar
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या