मुंबई, 18 ऑक्टोबर: महाराष्ट्रात मंदिरं उघडण्याच्या मुद्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी Network18 ग्रुपचे एडिटर-इन-चीफ राहुल जोशी यांनी घेतलेल्या खास इंटरव्ह्यूमध्ये (exclusive interview) भूमिका स्पष्ट केली. राज्यपालांनी 'ते शब्द टाळायला पाहिजे होते', असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. अमित शहा यांच्या या भूमिकेचं शिवसेना खासदार संजय राऊत स्वागत केलं आहे. एवढंच नाही तर त्यांचे आभारही मानले आहेत. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखेळकर यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केला आहे.
हेही वाचा...नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ, भाजप नगरसेवक पोहोचले शिवसेना नेत्यांच्या दरबारी
आमदार अतुल भातखेळकर म्हणाले, अमित शहा यांची भूमिका योग्यच आहे. परंतु त्याचा आधार घेऊन बेताल बडबड करणारे संजय राऊत यांनी त्याचं स्वागत करावं हा मात्र मोठा विनोदच आहे. संजय राऊत यांनी हा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला पाहिजे होता. राज्याच्या राज्यपालांना कशा पद्धतीचं पत्र पाठवावं आणि त्यात कशा गोष्टींचा उल्लेख करायला हवा.
इतर पक्ष आणि भारतीय जनता पक्षात नीतिमत्ता आणि सुसंस्कृत पणाचा काय फरक आहे, हेच कालच्या अमित शहा यांच्या वक्तव्यावर स्पष्ट होतं, असंही आमदार भातखेळकर यांनी सांगितलं आहे.
संजय राऊत यांनी मानले अमित शहांचे आभार...
संजय राऊत म्हणाले, 'राज्यपाल पत्राबाबत अमित शहांची भूमिका योग्यच आहे. आम्ही या वादावर आता पडदा टाकला आहे. अमित शहांचं वक्तव्य राजकीय अर्थानं नाही आहे. मी त्यांना ओळखतो ते सत्य भूमिका मांडतात.' मात्र, सुशांतसिंह प्रकरणाचं राजकारण राज्यातील भाजप नेत्यांनी केलं. जेडीयूच्या नेत्यांनी त्याचा बिहारच्या निवडणुकीत मुद्दा केला. सीबीआय दोन महिने झालं तपास करतंय त्याचं काय झालं? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ड्रग्जचा विषय फक्त बॉलीवूडचा नसून त्याचा संबंध संपूर्ण जगाशी आहे, असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा...ठरलं तर मग! आता मुख्यमंत्रीही घराबाहेर पडणार, पूरग्रस्त भागाचा दौरा करणार
दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक वादग्रस्त पत्र लिहिलं होतं. मंदिरं खुली करण्याची मागणी करणारं पत्र लिहिताना राज्यपालांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याची चर्चा झाली. याबाबत विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली असतानाच आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या पत्राबाबत भाष्य केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.