गरिबांचे तांदूळ विकले, आता लशीचं तसं करू नका - अतुल भातखळकरांचे सरकारवर आरोप
'गोरगरिबांच्या चुली पेटल्या पाहिजेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकण्याचे प्रकार महाराष्ट्रात घडले. लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं', असा आरोप भातखळकर यांनी केला.
मुंबई, 08 एप्रिल : एखाद्या मुद्दयाचं राजकारण करायचं नाही असं सर्वच पक्षांचे नेते वारंवार म्हणत असतात. पण तसं म्हणतानाही त्याचं राजकारणचं होत असतं हेही तेवढंच खरं. राज्यात दोन दिवसांपासून कोरोना लसीकरणाच्या डोसचा (Corona vaccine shortage in Maharashtra) विषय चांगलाच चर्चेत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. असं असताना दोन्ही सरकार बाजूचे नेतेदेखील या वादात उतरले आहेत. भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar on Uddhav thackeray government) यांनी देखील ठाकरे सरकारवर टीका करत असाच गंभीर आरोप केलाय.
राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केंद्र सरकारकडून लशींचे डोस कमी मिळाल्याचं सांगत अधिक डोसची मागणी केली होती. त्यावर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (health minister Harsh Vardhan) यांनी राज्य सरकार दिलेल्या लसींचा वापर योग्य प्रकारे करत नसल्याची टीका केली होती. त्यानंतर यावरून दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्यातच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करणारे ट्विट केले. गोरगरिबांच्या चुली पेटल्या पाहिजेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकण्याचे प्रकार महाराष्ट्रात घडले. लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं, असा आरोप भातखळकर यांनी केला. सोबतच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारावास भोगलेले लोक ठाकरे सरकारमध्ये मंत्री आहेत म्हणून भीती वाटते, दुसरं काय? असं म्हणत सराकरमधील मंत्र्यांवरूनही टोला मारला.
गोरगरिबांच्या चुली पेटल्या पाहिजेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकण्याचे प्रकार महाराष्ट्रात घडले. लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं.
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारावास भोगलेले लोक ठाकरे सरकारमध्ये मंत्री आहेत म्हणून भीती वाटते, दुसरं काय?
अतुल भातखळकर हे अनिल देशमुख किंवा इतर मुद्द्यावरूनही राज्यातील आघाडी सरकार आणि नेत्यांना लक्ष करत असलेले पाहायला मिळालं आहे. अनिल देशमुखांची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली त्यावरूनही त्यांनी चांगलंच सुनावलं. ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना कोर्टाच्या थपडा खाण्याची इतकी हौस आहे की काय? असा सवाल करत त्यांनी टीका केली आहे.
अनिल देशमुखांना दणका देत सीबीआय चौकशी योग्य असल्याचा सुप्रीम कोर्टाने निर्वाळा दिला आहे.
आधी 'दूध का दूध पानी का पानी होण्यासाठी चौकशी करा' म्हणणारे अनिल देशमुख चौकशी नको म्हणून सर्वोच्च न्यायालयात गेले आणि अपेक्षेप्रमाणे तोंडघशी पडले. @AnilDeshmukhNCP
अनिल देशमुखांना दणका देत सीबीआय चौकशी योग्य असल्याचा सुप्रीम कोर्टाने निर्वाळा दिला आहे.
आधी 'दूध का दूध पानी का पानी होण्यासाठी चौकशी करा' म्हणणारे अनिल देशमुख चौकशी नको म्हणून सर्वोच्च न्यायालयात गेले आणि अपेक्षेप्रमाणे तोंडघशी पडले. @AnilDeshmukhNCP
एकूणच राज्य सरकारच्या विरोधात भाजपच्या सर्वच नेते, आमदार यांनी हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे. सरकारल कोंडीत पकडण्याची एकही संधी भाजप दवडत नाही. त्यामुळं अशा प्रकारे त्यांचे नेते सराकरवर आणि मंत्र्यांवर टीका करत असतात. आता या आरोपांवर प्रत्युत्तर काय येणार आणि त्याचे पडसाद कसे उमटणार हे पाहावं लागेल.