मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...की सत्तेच्या खुर्चीसाठी तेही बोलणार नाही? आशिष शेलार यांचा शिवसेनेवर घणाघात

...की सत्तेच्या खुर्चीसाठी तेही बोलणार नाही? आशिष शेलार यांचा शिवसेनेवर घणाघात

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर विखारी टीका केली आहे.

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर विखारी टीका केली आहे.

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर विखारी टीका केली आहे.

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 8 मार्च : विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढवणारे भाजप आणि शिवसेना नंतरच्या काळात मात्र वेगवेगळे झाले. त्यानंतर या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर घणाघाती टीका केली जात आहे. अशातच आता पुन्हा एकदा हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर विखारी टीका केली आहे.

'हिंदुत्व सोडणार नाही, वा! स्वा.सावरकर बलात्कारी? पण आम्ही बोलणार नाही..देशात येणाऱ्या हिंदूना नागरित्व, आम्ही देणार नाही.. रामसेतू काल्पनिक, आम्ही मौन सोडणार नाही..पत्रपंडित हो, हिंदुत्वाची तुमची व्याख्या तर एकदा सांगा? मांडा नवा इथॉस मांडा..की सत्तेच्या खुर्चीसाठी तेही बोलणार नाही?' असा तिखट सवाल करत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

भाजपची टीका आणि शिवसेनेचं हिंदुत्व

एकीकडे भाजपकडून हिंदुत्वाच्या मुद्द्याबाबत शिवसेनेवर टीका होत असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्येत रामल्लांचं दर्शन घेतलं. उद्धव ठाकरे यांचा हा तिसरा अयोध्या दौरा आहे. अयोध्येत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी महत्त्वाची घोषणा केली. अयोध्येत प्रस्तावित राम मंदिरासाठी शिवसेनेच्या ट्रस्टकडून 1 कोटी रुपयांची देणगी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. मंदिर बांधकामात फुल नाही तर फुलाची पाकळी या विचाराने अतिशय विनम्रपणे हे योगदान देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्री म्हणून नाही, महाराष्ट्र सरकारच्या वतीने नाही तर ही देणगी ट्रस्टच्या वतीने देत असल्याचं त्यांनी सांगितलं. माझी ही तिसरी अयोध्या भेट असून प्रत्येक दौऱ्यानंतर आम्हाला यश मिळालं असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा- 'अमृता फडणवीस यांना ट्रोल करण्याचा अधिकार', राष्ट्रवादीच्या महिला मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

शिवसेनेने अयोध्या आंदोलनात सहभाग घेतला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही सक्रिय पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्या सर्व आठवणी ताज्या झाल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेने भाजपला सोडलं हिंदुत्वाला नाही असंही ते म्हणाले. यापुढेही मी अयोध्येत येत राहीन अशी घोषणाही त्यांनी केली.

First published:

Tags: Ashish shelar, Shivsena