• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यासोबत राष्ट्रवादीनं 'सेल्फी' का काढला नाही? शेलारांचा खोचक सवाल

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यासोबत राष्ट्रवादीनं 'सेल्फी' का काढला नाही? शेलारांचा खोचक सवाल

गतवर्षी खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई-गोवा महामार्गावर हा 'स्तुत्य उपक्रम' का राबत नाही?

  • Share this:
मुंबई, 30 ऑगस्ट: मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यावरून विरोधीपक्ष भाजप आक्रमक झाला आहे. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्र लिहिलं आहे. आशिष शेलार यांना या पत्रांतून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर खोचक टीकाही केली आहे. हेही वाचा....सेल्फीनं केला घात! मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोन मुलांना आईसमोरच जलसमाधी 'गतवर्षी खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई-गोवा महामार्गावर हा 'स्तुत्य उपक्रम' का राबत नाही? कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांना का यावर्षी एवढे छळताय? संपूर्ण महामार्गाची दुर्दशा झालेली का दिसत नाही? कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय?' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत आशिष शेलार यांनी काही सवाल केले आहेत. आशिष शेलार यांनी पत्रात म्हटलं आहे की, महाविकास आघाडी सरकारने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची ठरवून कोंडी केली आहे. वेळीच ई-पास उपलब्ध करून दिले नाहीत. एसटी उपलब्ध करून दिली नाही. रेल्वे गाड्या सोडण्यास तयार असताना गाड्यांची मागणी वेळीत केली नाही. क्वारंटाईन कालावधी व आरोग्याच्या उपाययोजना याबाबत सरपंच आणि कोकणातील लोकप्रतिनिधी यांच्या वेळीच चर्चा केली नाही. सरकारच्या अशा आठमुठ्या भूमिकेतून मार्ग काढून कोकणी माणूस आपल्या गावी गणेशोत्सवासाठी पोहोचला. मात्र, चाकरमान्यांचे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी जीव मेटाकुटीस आणला. मुंबई-गोवा महामार्ग पनवेलपासून चिपळूनपर्यत पूर्णपणे उखडून गेला आहे. नव्यानं बांधण्यात आलेल्या या रस्त्यावरील नव्या पुलांसह सर्व रस्त्यांवर डांबर शिल्लक राहिलेलं नाही. मार्गावर सर्वत्र खड्डे, खडी अवस्था आहे. खेड्यातील कच्च्या रस्त्यांपेक्षाही या महामार्गाची दयनिय अवस्था झाली आहे. हेही वाचा....'काही काँग्रेस नेत्यांना राज्यात शिवसेना सोबत नको आहे' दरवर्षी पावसामुळे पडणारे खड्डे गणेशोत्सव काळात बुजवण्यात येतात. मात्र यंदा राज्य सरकारने कोणत्याही प्रकारे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आता परतीच्या प्रवासात असलेल्या चाकरमान्याना कंबरेचे आजार होतील की काय? अशी भीती वाटत आहे. कोकणच्या रस्त्याकडे सरकारने दुर्लक्षाबद्दल तसेच कोकणातील माणसाला मानसिक, शारीरिक त्रासाबद्दल निषेध करतो, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: