सत्तेपासून दूर राहिलेली भाजप 'इन अ‍ॅक्शन', 3 दिवसांच्या बैठीकचं आयोजन

सत्तेपासून दूर राहिलेली भाजप 'इन अ‍ॅक्शन', 3 दिवसांच्या बैठीकचं आयोजन

शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदावरून घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर भाजप बॅकफूटवर गेली.

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 105 जागा मिळवलेला भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर राहिला आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदावरून घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर भाजप बॅकफूटवर गेली. त्यानंतर आता भाजपकडून तीन दिवसांच्या बैठकांचे आयोजन केलेलं आहे. मुंबईतील दादर इथल्या मुंबई भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात या बैठका होणार आहेत. आजपासून सलग तीन दिवस या बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे.

विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले आमदार, जिल्हाध्यक्ष संघटनमंत्री, पदाधिकारी तसंच विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले भाजपचे उमेदवार हे या बैठकीत सामील होणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष राहूनही सत्तास्थापनेत पक्षाला यश आलं नसल्यामुळे आमदारांच्या बैठकीत त्यांचे मनोधैर्य वाढवलं जाईल.

भाजपकडून जिल्हाध्यक्ष संघटनमंत्री, पदाधिकारी यांना येत्या काळात पक्षसंघटनेत करायच्या कामाबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसंच येत्या 31 डिसेंबरपर्यंत संघटनात्मक निवडणुका करण्याबद्दलही मार्गदर्शन केलं जाईल. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत 164 जागा लढवल्या होत्या होत्या. त्यात 105 उमेदवार विजयी झाले. या उरलेल्या पराभूत उमेदवारांचीही पक्षातर्फे बैठक घेतली जाणार आहे.

आजच्या पहिल्या दिवशी आमदारांची बैठक असून उद्या जिल्हाध्यक्ष, संघटनमंत्री, पदाधिकारी आणि शनिवारी शेवटच्या दिवशी पराभूत उमेदवार अशा बैठका होणार आहेत. या बैठकांसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पक्षाच्या राज्य प्रभारी सरोज पांडे उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षामुळं राजकीय वातावरण अक्षरश: ढवळून निघालंय. मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-सेनेत बिनसल्यानंतर राज्यात अभुतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. तर दुसरीकडे भाजपपासून फारकत घेतलेल्या शिवसेनेनं काँग्रेस-राषट्रवादीच्या मदतीनं सत्तास्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. सत्तेचं सोपान गाठण्यासाठी विरोधी विचारधारेच्या पक्षांनी एकत्र येण्याच्या दिशेनं आता वाटचाल सुरू केली आहे.

BREAKING VIDEO : अजित पवार नाराज झाले का? जितेंद्र आव्हाडांनी दिलं स्पष्टीकरण

Tags:
First Published: Nov 14, 2019 09:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading