मुंबई, 19 जुलै: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विरोधक हे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही आहे. आता बीकेसीमधील कोविड सेंटरच्या आर्थिक व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा सणसणीत आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केली आहे.
हेही वाचा...पुण्यातील सलोनी सातपुतेच्या 'त्या' VIRAL VIDEO मागील REAL कहाणी आली समोर
भाजपचे आमदार अमित साटम यांनी लोकायुक्तांकडे एमएमआरडीएतर्फे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे निविदा न मागवता कोविड सेंटर उभारण्याचं काम दिल्याबद्दल तक्रार केली आहे. एमएमआरडीएने कोणतीही निविदा न मागवता बीकेसी 40 कोटींपेक्षा जास्त काम दिलं आहे. त्यात 22 कोटी रुपये खर्च हा केवळ तात्पुरते शेड उभारण्यासाठी करण्यात आला आहे.
बीकेसी कोविड सेंटरच्या व्यवहारात मोठा भ्रष्टाचार....#coronavirus #CoronavirusIndia #Bjp pic.twitter.com/ltiANBhEiY
— News18Lokmat (@News18lokmat) July 19, 2020
हे काम जास्त किमतीला दिले असून काही वस्तूंसंदर्भात कमी किमतीचे कोटेशन्स प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या सगळ्या व्यवहाराबाबत आमदार साटम यांनी शंका व्यक्त केली आहे.
तसेच हे सेंटर 50 टक्केपेक्षा जास्त रिक्त जागा असून एवढे मोठे सेंटर करण्याच्या निर्णयावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं देखील आमदार साटम यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा...धक्कादायक! महाराष्ट्र पोलिस दलात 24 तासांत 133 जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू
याशिवाय कोविड सेंटरमध्ये डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे हे सेंटर तयार करून सरकारनं नेमकं काय साध्य केलं, असा सवाल देखील आमदार साटम यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात लोकायुक्तांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार साटम यांनी केली आहे.