मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मी हवामान बघतो अन्...', भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच अमोल कोल्हेंचा गुगली

'मी हवामान बघतो अन्...', भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच अमोल कोल्हेंचा गुगली

भाजपने 2024 साठी शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकल्याने फक्त शिंदे गटाचे शिवाजीराव आढळराव पाटीलच अस्वस्थ बनलेले नाहीत, तर राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे 2024 नेमके कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढणार? याचीही नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी

शिरूर, 25 नोव्हेंबर : भाजपने 2024 साठी बारामतीपाठोपाठ आता शिरूर लोकसभा मतदारसंघावरही दावा ठोकल्याने फक्त शिंदे गटाचे शिवाजीराव आढळराव पाटीलच अस्वस्थ बनलेले नाहीत, तर राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे 2024 नेमके कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लढणार? याचीही नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

पवारांच्या पुणे जिल्ह्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं जरा जास्तच लक्ष घातलंय. बारामतीपाठोपाठ आता शिरूर लोकसभा मतदारसंघावरही भाजपने दावा ठोकलाय. उमेदवार कोणीही असो, शिरूरमध्ये भाजपच लढेल, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी केला आहे. आढळराव पाटीलच काय, अमोल कोल्हेही भाजपमध्ये आले तर स्वागतच आहे, असं प्रल्हादसिंग पटेल म्हणाले आहेत.

शिरूर हा खरंतर शिवाजीराव आढळराव पाटलांचा मतदारसंघ, पण 2019 ला ते राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांच्याकडून पराभूत झालेत, पण कोल्हेच राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा सातत्याने घडवून आणल्या जाताहेत त्यामुळे 2024 ला अमोल कोल्हे तर भाजपचे उमेदवार राहणार नाहीत ना? याचीही आतापासूनच जोरदार चर्चा सुरू झाली. समजा असं झालं तर शिंदे गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांचं काय होणार? अशीही चर्चा सुरू झाली. याबाबत आम्ही आढळराव पाटलांना विचारलं असता त्यांनी कॅमेरासमोर बोलणं टाळलंय, पण शिरूरमधून कोण लढणार? हे एकनाथ शिंदेच ठरवतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

अमोल कोल्हेंचा गुगली

'मी हवामान बघून नांगरतो', असं गोल गोल उत्तर देत अमोल कोल्हे यांनी आपण 2024 लाच पत्ते ओपन करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलही सध्यातरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहेत. दुसरीकडे भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगेही शिरूरमधून इच्छूक असल्याचं कळतंय, त्यामुळे 2024 ला शिरूरची लढत ही राष्ट्रवादी विरूद्ध भाजप अशीच होणार असली तरी समोरचा उमेदवार कोण ? यावरच तेव्हाची राजकीय गणितं ठरतील.

First published:

Tags: BJP, NCP