रावसाहेब दानवे हे येडपट आणि भैताड, काँग्रेसच्या मंत्र्याची विखारी टीका

रावसाहेब दानवे हे येडपट आणि भैताड, काँग्रेसच्या मंत्र्याची विखारी टीका

'हे भैताड कसं काय राजकारणात आलं माहित नाही. लहान मुलं पाहत असलेल्या कार्टुन मालिकांमध्ये माणूस काही करतो तसं काही दानवे करत असतात'

  • Share this:

नागपूर, 12 डिसेंबर : कृषी कायद्याविरोधात (farmers act 2020) आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर (farmers protest) टीका केल्यामुळे भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve)यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.  ‘शेतकऱ्यांचा अपमान करणे रावसाहेब दानवे हे येडपट आणि भैताड आहे’ अशी जहरी टीका काँग्रेसचे नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा विजय वडेट्टीवार यांनी खास विदर्भाच्या स्टाईलमध्ये समाचार घेतला.

रेल्वेचे खाजगीकरण होऊन प्रवाशांना मिळणाऱ्या या सुविधा बंद होणार?

'रावसाहेब दानवे हे भैताड आणि येडपट आहे. हे भैताड कसं काय राजकारणात आलं माहित नाही. लहान मुलं पाहत असलेल्या कार्टुन मालिकांमध्ये माणूस काही करतो तसं काही दानवे करत असतात.  शेतकऱ्यांचा अनादर करणाऱ्या व्यक्तीला भाजपात मंत्री केलं जातं, भाजपची कीव येते’ अशा शब्दात  विजय वडेट्टीवार यांनी दानवेंवर सडकून टीका केली.

तसंच, 'रावसाहेब दानवेंच्या कमरेत हानायला पाहिजे. असं बच्चू कडू म्हणाले होते. कडू यांनी सांगितल्या प्रमाणे दानवे यांच्या कमरेत डावा किंवा उजवा घालायला हवा’ अशी विखारी टीकाही वडेट्टीवार यांनी दानवे यांच्यावर केली.

'त्या क्रेडिट कार्डची माहिती द्या', ईडीने प्रताप सरनाईकांना पुन्हा बोलावले चौकशी

शेतकऱ्यांचा अपमान करताना यांना लाज कशी वाटत नाही? केंद्रीय गृहमंत्री  अमित शहा एकीकडे शेतकऱ्यांशी चर्चा करत आहे. मग पाक -चीनचे शेतकरी असेल तर कशाला चर्चा करायची मग? असा सवालही वडेट्टीवार यांनी विचारला.

‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे भुतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ आहे. राजकारणात सर्वांचे गुरु, असे शरद पवार नेते आहेत. आज 12 तारीख आहे.  शरद पवार यांचा वाढदिवस, त्याचप्रमाणे माझाही आज वाढदिवस आहे. त्यांच्या जन्मदिनी माझा जन्म होणे, हे माझं भाग्य आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.

दानवे यांच्या औरंगाबाद येथील घरासमोर निदर्शनं

दरम्यान, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्ली येथील आंदोलनात पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचे संबोधले आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राज्यभरात शिवसेना, स्वाभिमानी संघटनेकडून दानवेंच्या विरोधात निदर्शनं सुरू आहे. आज औरंगाबादेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रावसाहेब दानवे यांच्या औरंगाबाद येथील घरासमोर निदर्शनं करत शेतकऱ्यांची माफी मागण्याची मागणी केली. नसता पुढील होणाऱ्या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जा असा इशारा ही संघटनेने दिला आहे.

जळगावात रावसाहेब दानवेंच्या पुतळ्याचे दहन

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील वरणगांव शहर  व भुसावळ तालुका शिवसेनेच्या वतीने रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ व महागाईच्या विरोधात बस स्थानक चौकात घोषणाबाजी करून दानवेच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास  आदी शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Published by: sachin Salve
First published: December 12, 2020, 2:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या