मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जे पराक्रम केले ते भोगावेच लागणार; राऊतांना गिरीश महाजनांनी पुन्हा डिवचलं

जे पराक्रम केले ते भोगावेच लागणार; राऊतांना गिरीश महाजनांनी पुन्हा डिवचलं

भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India

जळगाव, 25  डिसेंबर : भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तुम्ही जे पराक्रम केले आहेत त्याचे भोग भोगावेच लागतील असा इशारा गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना दिला आहे. शिंदे, फडणवीस सरकार सूडबुद्धीने काम करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता, यालाही महाजन यांनी उत्तर दिलं आहे. गेल्या तीन वर्षांच्या काळात आपण काय केलं हे जरा तपासून बघा असं टोला महाजन यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

नेमकं काय म्हटलं महाजन यांनी? 

गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  शिंदे, फडणवीस सरकार सूडबुद्धीने काम करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता, संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी जोरदार टोला लगावला आहे. गेल्या तीन वर्षांच्या काळात तुम्ही काय केलं हे जरा तपासून बघा, असं महाजन यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना महाजन यांनी म्हटलं की, नवाब मलिक, अनिल देशमुख यांना आतापर्यंत हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने जामीन का दिला नाही? कारण त्यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीतरी तथ्य़ असेल म्हणून कोर्ट त्यांना जामीन देण्यास तयार नाही. तुम्ही जे पराक्रम करून ठेवले ते तुम्हाला भोगावेच लागतील, असा इशाराही गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

हेही वाचा :  'त्या' व्हिडीओमुळे अमोल मिटकरी अडचणीत; कारवाई होणार?

राऊतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही 

दरम्यान शनिवारी देखील संजय राऊत यांच्यावर महाजन यांनी घणाघाती टीका केली होती. संजय राऊत वाटेल ते बोलत असतात. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. लोकही त्यांना ऐकूण बोअर झाले आहेत, असं महाजन यांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Girish mahajan, Sanjay raut, Shiv sena