महाराष्ट्रात राजकीय तांडव, राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले नेते पुन्हा घड्याळ हाती घालणार?

महाराष्ट्रात राजकीय तांडव, राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले नेते पुन्हा घड्याळ हाती घालणार?

नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात भूकंप

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी परळीतील गोपीनाथ गडावर समर्थकांचा मेळावा घेऊन आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 'पक्ष माझ्या बापाचा आहे, असं मी का म्हणू नये. मी बंडखोरी का करू? मी पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. आता चेंडू भाजपच्या कोर्टात आहे,' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली खदखद व्यक्त केली. यानंतर आता यावर अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. एका मराठी वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

विधानसभा निवडणुकांनंतर भाजपच्या नेत्यांमध्ये खदखद आहे. पक्षावर दिग्गज नेते नाराज आहेत. त्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. यावर भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात आहेत. जे नेते राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले ते आमदारदेखील आमच्या संपर्कात असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या गोपीनाथ गडावर आयोजित पंकजा मुंडेंच्या या 'खास' मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. अनेक नेत्यांनी यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र, भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला पुन्हा एकदा घरचा आहेर दिला. एवढेच नाही तर पंकजांचे सांगत नाही पण माझा भरवसा नाही, असे सांगत खडसेंनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले.

इतर बातम्या - हैदराबाद बलात्कार, हत्या प्रकरणी आला पीडितेच्या जळालेल्या मृतदेहाचा DNA रिपोर्ट

पंकजा मुंडे यांचा पराभव झाला नाही घडवला, खडसेंनी स्वकीयांवर घणाघात केला. शेटजी, भटजींचा पक्ष म्हणून हिणवल्या जाणाऱ्या भाजपला बहुजनांचा चेहरा देण्याचं काम गोपीनाथ मुंडेंनी केलं. मुंडेच्या मतदारसंघात पंकजा पराभूत झाली हे दु:ख आहे. पंकजाला बोलता येत नाहीय ती वेदना सहन करतेय, असेही खडसेंनी यावेळी सांगितले. जुन्या नेत्यांनी पक्ष सोडून जावे, अशी नीती अवलंबली जात आहे. माझ्या समंतीशिवाय देवेंद्र पक्षाध्यक्ष झाले नसते. आधी माझं तिकीट कापलं गेलं. जास्त बोललं तर शिस्तभंग होईल, अशी धमकी देण्यात आली. एकनाथ खडसेंकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक करत अजून किती दिवस सहन करायचं? असा सवाल खडसेंनी उपस्थित केला.

इतर बातम्या - निर्भया प्रकरणी आरोपींची फाशी होणार रद्द?, दया याचिकेच्या सुनावणीकडे देशाचे लक्ष

दरम्यान, सभेपूर्वी बोलताना आपण भाजपवर नाराज नाही, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. "मी निवडणुकीत पहिल्यांदाच पराभूत झाले. म्हणूनच आत्मपरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ मी भाजपवर नाराज आहे, असा नाही. पंकजा मुंडे भूकंप करणार. भूकंप ही काही चांगली बाब नाही. पण कुणाचीही हानी होणार नाही, असा भूकंप करण्याचा प्रयत्न मी करेन." असे संकेत माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आधीच दिले होते.

इतर बातम्या - पत्नी जीन्स घालायची म्हणून चढायचा पारा, रागात पतीने आवळला गळा पण...!

Published by: Renuka Dhaybar
First published: December 13, 2019, 11:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading