विधानसभेसाठी भाजप करणार 'गेमचेंजर'ची घोषणा, प्रदेशाध्यक्ष निवडीचा मुहूर्त ठरला!

विधानसभेसाठी भाजप करणार 'गेमचेंजर'ची घोषणा, प्रदेशाध्यक्ष निवडीचा मुहूर्त ठरला!

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असलेल्या रावसाहेब दानवे यांचा केंद्रातील मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 जून : भाजप मुख्यालयात 13 जून रोजी एका महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत भाजपचे देशभरातील प्रदेशाध्यक्ष, सरचिटणीस, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत पक्षाअंतर्गत निवडणूक कार्यक्रमाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. तसंच यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निवडीसंदर्भात निर्णय होईल, अशी माहिती मिळाली आहे.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असलेल्या रावसाहेब दानवे यांचा केंद्रातील मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. या पदासाठी भाजपमधून अनेक नेत्यांची नावं चर्चेत आली आहेत.

दानवे दिल्लीत जाणार असल्याने भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी आता शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपचे सरचिटणीस संजय कुटे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी भाजपकडून त्या तोडीच्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपदी बसवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे या पदासाठी भाजप कुणाला संधी देतं, हे आता पाहावं लागेल.

VIDEO: खासदार झाल्यानंतर अमोल कोल्हेंचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

First published: June 10, 2019, 11:53 AM IST
Tags: BJP

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading