चंद्रकांत पाटीलही उतरणार निवडणुकीच्या आखाड्यात, हा असेल मतदारसंघ?

चंद्रकांत पाटीलही उतरणार निवडणुकीच्या आखाड्यात, हा असेल मतदारसंघ?

'मुख्यमंत्रिपदाचा वाद उद्धव ठाकरे आणि भाजपचे श्रेष्ठी सोडवतील शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्या म्हणण्याला आम्ही महत्व देत नाही.'

  • Share this:

चंद्रकांत फुंदे, पुणे 22 जुलै : भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विभासभेची निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाने आदेश दिला तर विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचं पाटील यांनी आज पुण्यात झालेल्या भाजपच्या मेळाव्यात स्पष्ट केलं. चंद्रकांत पाटील यांनी आत्तापर्यंत थेट निवडणूक कधीच लढविलेली नाही. ते कायम विधान परिषदेच्या माध्यमातूनच आमदार झालेत. मात्र राज्यातलं वातावरण अनुकूल असल्याने दादांनी आता थेट लोकांमधून निवडून येण्याचं ठरवल्याचं बोललं जातंय.

विधानसभेच्या तयारीसाठी यात्रांचा सुकाळ, आता काँग्रेसचंही वरातीमागून घोडं

चंद्रकांत पाटील हे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे विश्वासू आहेत. पाच वर्षांपर्यंत दादा हे कायम पडद्यामागे राहूनच संघटनेचं काम करत असत. मात्र भाजपची सत्ता आल्यानंतर दादांना मंत्रिमंडळात क्रमांक दोनचं स्थान देण्यात आलं. तेव्हापासून दादांचं वजन भाजपमध्ये चांगलंच वाढलं. स्वच्छ चारित्र्य, लो प्रोफाईल स्वभाव यामुळे दादांना पक्षाच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान मिळालं.

लोकसभा निवडणुकीत त्यांनी थेट बारामतीत जाऊन शरद पवारांनाच आव्हान दिलं होतं. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांना लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढवून दाखवा असं आव्हान विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून दिलं गेलं. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरातून निवडणूक लढऊन या सर्व टीकेला उत्तर देण्याचा त्यांचा विचार असल्याचं बोललं जातंय.

मी पाच जिल्ह्याच्या पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषद लढलो. पवारांना तरी पाच जिल्ह्यातून लढता आलं का? असा टोला त्यांनी शरद पवारांना लगावला. चंद्रकांतदादांना विधानसभा लढवून दाखवावी, असं आव्हान पवारांनी दिलेलं त्याला पाटलांनी पुण्यात प्रत्युत्तर दिलंय.

'काँग्रेस'साठी धोक्याची घंटा, या आमदाराने दिल्या CMना वाढदिसाच्या शुभेच्छा

मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्रिपदाचा वाद उद्धव ठाकरे आणि भाजपचे श्रेष्ठी सोडवतील शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्या म्हणण्याला आम्ही महत्व देत नाही असंही त्यांनी सांगितलं. मित्रपक्षाने आम्हाला धमक्या देऊ नये, सत्तेचा माज, मस्ती उतरविण्याची  ताकद शिवबंधनात आहे अशी धमकीच तानाजी सावंत यांनी रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये बोलताना भाजपला दिली होती. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच नाही तर पंतप्रधान झालेलेही बघायला आवडेल, पण त्यांनी निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 06:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading