मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'बॉम्ब ब्लास्ट होतील, असे...', भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

'बॉम्ब ब्लास्ट होतील, असे...', भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव करण्यासाठी भाजप प्रचंड कामाला लागली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India
  • Published by:  Chetan Patil

अमरावती, 29 सप्टेंबर : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यात आज जे सरकार स्थापन झालेलं आहे ते सरकार अशा पद्धतीने स्थापन होईल, अशी कुणालाही कल्पना नव्हती. राज्यात तीन महिन्यांपासून भाजप आणि शिंदे गटाचं सरकार आहे. विशेष म्हणजे तीन महिन्यांनंतरच्या सत्ताबदलानंतरही महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी कमी होताना दिसत नाहीय. याशिवाय महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. बॉम्ब ब्लास्ट होतील असे प्रवेश भाजपमध्ये होतील, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव करण्यासाठी भाजप प्रचंड कामाला लागली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर्चवस्वाला सुरुंग लावण्यासाठी भाजप त्यांच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्याच्या तयारीत लागली आहे. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा आगामी निवडणुकांमध्ये पराभव केला की कार्यकर्त्यांमध्ये सहज नकारात्मक वातावरण निर्माण होईल, अशी भाजपची रणनीती आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांना आपल्या पक्षात सामील करुन घेण्याचा भाजपचा प्लान आहे. त्यासाठी भाजपच्या गोटात अनेक हालचाली घडत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याबद्दल आधीच इशारा देखील दिला आहे.

(2014 चा प्लान कसा फसला? शिंदेंबाबत गौप्यस्फोट करताना काँग्रेसचं टार्गेट राष्ट्रवादी!)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज अमरावतीत दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. "आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे तब्बल 18-18 तास सलग काम करतात. तसेच अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमध्ये जे वंचित झाले ते सर्व लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. भाजपमध्ये बॉम्ब ब्लास्ट होतील असे प्रवेश हतील. तर महाविकास आघाडीला आगामी 2024 च्या निवडणुकीत एकही उमेदवार मिळणार नाही. त्यांनी फक्त 2024 ची वाट बघावी", अशा शब्दांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना डिवचलं आहे.

'बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस चे घड्याळ बंद पाडू'

"राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना आजही शरद पवारांचा आधार घ्यावा लागतो. त्या शरद पवार यांच्या नावावर कितीदा निवडून येतील? आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावरच लोक निवडून येणार. मोदींच्या नावावरच सरकार येतील. फक्त बारामती शहराचा विकास झाला आहे. बारामती मतदारसंघात पाच मतदारसंघ येतात ते मतदारसंघ विकासापासून आजही वंचित आहेत. आता पवार कुटुंबाच्या पायाखालची वाळू घसरली आहे. हे एकविसावं शतक आहे. त्यामुळे आगामी काळात बारामतीला झटका बसेल", असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

First published:

Tags: BJP, Shiv sena