• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • परमबीर सिंगांना भाजपनेच गायब केलं, शेवटचं लोकेशन गुजरातमध्ये, नाना पटोलेंचा थेट आरोप

परमबीर सिंगांना भाजपनेच गायब केलं, शेवटचं लोकेशन गुजरातमध्ये, नाना पटोलेंचा थेट आरोप

' ज्याने आरोप केले तोच गायब असेल तर वास्तव लोकांसमोर आणण्याचे गरजेचं आहे, अनिल देशमुख यांच्याबद्दल सूड भावनेनं कारवाई करण्यात आली आहे'

' ज्याने आरोप केले तोच गायब असेल तर वास्तव लोकांसमोर आणण्याचे गरजेचं आहे, अनिल देशमुख यांच्याबद्दल सूड भावनेनं कारवाई करण्यात आली आहे'

' ज्याने आरोप केले तोच गायब असेल तर वास्तव लोकांसमोर आणण्याचे गरजेचं आहे, अनिल देशमुख यांच्याबद्दल सूड भावनेनं कारवाई करण्यात आली आहे'

 • Share this:
  राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 07 नोव्हेंबर :  100 कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) सध्या ईडीच्या (ed) कोठडीत आहे. तर दुसरीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parmbar singh) अजूनही बेपत्ता आहे. पण, त्यांचं शेवटचं लोकेशन हे गुजरातमधील अहमदाबादमध्ये होतं, तिथूनच त्यांना भाजपने गायब केलं, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केला आहे. बुलडाण्यामध्ये पत्रकारांशी बोलत असताना नाना पटोले यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. तसंच 100 कोटी वसुली प्रकरणावरून पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला दूर करण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्न सुरू आहे. बिहार निवडणुकीच्या तोंडावर सुशांत सिंह राजपूत प्रकरण उकरून काढले. राजपूत समाजाचे मतं मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहे. र्यन खान अटक प्रकरणावरून भाजपने हिंदू-मुस्लिम वाद पेटवला आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम भाजपने केले आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली. Puneeth Rajkumar च्या डॉक्टरला मिळालं पोलीस संरक्षण; अभिनेत्याच्या मृत्यूनंतर... परमबीर सिंग यांचं जे शेवटचं लोकेशन हे ईडीने सांगितलं आहे की ते अहमदाबादमध्ये होतं. त्यानंतर ते कुठे होते हे कुणालाच दिसले नाही. याचाच अर्थ गुजरातमधून परमबीर सिंग गायब झाले. त्यांना बेपत्ता करण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे, असा आरोपच पटोले यांनी केला. तसंच, ज्याने आरोप केले तोच गायब असेल तर वास्तव लोकांसमोर आणण्याचे गरजेचं आहे, अनिल देशमुख यांच्याबद्दल सूड भावनेनं कारवाई करण्यात आली आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली. माळशेज घाटात भीषण अपघात; कार दरीत कोसळून महिलेचा जागीच मृत्यू, 6 जखमी त्याचबरोबर काँग्रेसवर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी खोटे आरोप केले आहे. आम्ही किरीट सोमय्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून कारवाईला तयार राहावे, असंही पटोले म्हणाले. पेट्रोल डिझेल दराबाबत बोलताना केंद्राने 60 रुपये प्रति लिटर दर कमी केले पाहिजे सांगत लवकरच राज्य सरकार पेट्रोल डिझेलवरील कर कमी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यात लवकरच पेट्रोल डिझेलचे दर कमी झालेले पाहायला मिळतील, अशी माहितीही पटोले यांनी दिली.
  Published by:sachin Salve
  First published: