खडसे, तावडे आणि बावनकुळेंचा पत्ता कट, भाजपची दुसरी यादी जाहीर

आपल्याला तिकीट नाकारणार असल्याचा अंदाज आल्यानेच खडसे यांनी मंगळवारी आपला अर्ज दाखल केला होता. नंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी आपली दु:ख व्यक्त केलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2019 10:32 PM IST

खडसे, तावडे आणि बावनकुळेंचा पत्ता कट, भाजपची दुसरी यादी जाहीर

मुंबई 02 ऑक्टोंबर : भाजपची 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झालीय. या यादीतून भाजपच्या काही दिग्गज नेत्यांचा समावेश नाही. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे या दिग्गज नेत्यांचा समावेश नाही. यातलं विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नावं नसने हा मोठा धक्का समजला जातोय. बावनकुळे हे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे कट्टर समर्थक समजले जातात. या यादीत एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खेवलकर यांचंही नाव नाही. अजित पवारांच्या विरोधात गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. भाजपच्या पहिल्या यादीत खडसे यांचं नाव नव्हतं. मात्र दुसऱ्या यादीत नाव येईल असंही बोललं जात होतं.

नितेश राणेंच्या उमेदवारीवर भाजप घेणार 'या' तारखेला निर्णय

खडसेंच्या ऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. 2014च्या निवडणुकीनंतर खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना डावलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपानंतर खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. आपल्याला तिकीट नाकारणार असल्याचा अंदाज आल्यानेच खडसे यांनी मंगळवारी आपला अर्ज दाखल केला होता. नंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी आपली दु:ख व्यक्त केलं होतं.

ही आहे दुसरी यादी

साक्री - मोहन गोकूळ सुर्यवंशी

Loading...

धामनगाव रेल्वे -प्रतापदादा अरूणभाऊ अडसळ

मेळघाट - रमेश मावसकर

गोंदिया  - गोपाळदास अग्रवाल

अहेरी-  अमरिश राजे अत्राम

पुसद - निलय नाईक

हे पैसे कुणाचे? निवडणुकीचा माहोल, गुजरात मेलमधून तब्बल साडे सात कोटी जप्त

उमरखेड - नामदेव ससाणे

बगलान - दिलीप बोरसे

उल्हासनगर - कुमार उत्तमचंद आयीलानी

बारामती - गोपीचंद पडळकर

मावळ - संजय बाळा भेगडे

केज - नमीता मुंदडा

लातूर (शहर) - शैलेश लाहोटी

उदगीर - अनिल कांबळे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 10:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...