महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बातमी, एकनाथ खडसेंचा पत्ता कट होणार?

महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बातमी, एकनाथ खडसेंचा पत्ता कट होणार?

एकनाथ खडसेंच्या ऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.

  • Share this:

मुंबई 02 ऑक्टोंबर : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घटना घडत आहेत. भाजपच्या दुसऱ्याही यादीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय. भाजपच्या पहिल्या यादीत खडसे यांचं नाव नव्हतं. मात्र दुसऱ्या यादीत नाव येईल असंही बोललं जात होतं. मात्र दुसऱ्या यादीत नाव नसल्याने त्यांचा पत्ता कट होणार हे निश्चित समजलं जातंय. खडसेंच्या ऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. 2014च्या निवडणुकीनंतर खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना डावलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपानंतर खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. आपल्याला तिकीट नाकारणार असल्याचा अंदाज आल्यानेच खडसे यांनी मंगळवारी आपला अर्ज दाखल केला होता. नंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी आपली दु:ख व्यक्त केलं होतं.

आदित्य ठाकरेंचा 'केम छो'च्या डावावर विरोधकांचा 'मराठी' बाणा... असं रंगलं राजकारण

खडसे म्हणाले माझा काय गुन्हा?

नाराज झालेल्या खडसेंनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर आपल्या भावनांना आज वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले, गेली चाळीस वर्ष आपण पक्षाशी प्रामाणिक राहिलो. इतर पक्षातून अनेकवेळा मंत्री पदापासून वेगवेगळी प्रलोभने आपल्याला आली मात्र आपण पक्षाची बांधिलकी कधीही सोडली नाही. मात्र गेल्या काही वर्षात सतत आपली उपेक्षा केली गेली.

हे सगळं करून झाल्या नंतर बाहेरच्यांच्या आरोपांवरून कोणतीही चूक नसताना आपल्याला  तीन वर्षांच्या पासून मंत्री पदावरून दूर केलं गेलं. भोसरी जमीन प्रकरणात आणि दाऊद च्या बायकोशी बोलण्या प्रकरणात विनाकारण आपल्यावर आरोप झालेत. चौकशीत काहीही आलं नाही. या घटनात आपल्यावरील आरोप कोणी सिद्ध करून दाखविल्यास आपण राजकारणातून संन्यास घेऊ असं खडसे यांनी म्हटलंय.

'युती'च्या घटकपक्षांची 'या' 14 जागांवर बोळवण, भाजपला मिळणार 150 जागा!

आपल्याला तिकीट मिळो अथवा न मिळो जनता आपल्या पाठीशी असल्याचा दावा खडसे यांनी केलाय. गेली चाळीस वर्ष जनतेने साथ दिल्यामुळेच आपण आज इथपर्यंत पोहोचलो असल्याने सांगत खडसे यांनी जनतेचे आभार मानले. पुढील काळात देखील साथ जनतेने द्यावी असं भावनिक आवाहन देखील खडसे यांनी यावेळी केलं. यादीत नाव नसल्याने  निराश झालेल्या खडसेंनी म्हटलं आहे की चाळीस वर्ष आपण प्रामाणिकपणे काम करून आपल्याला असं वागविले गेलं या बाबत मी माझ्या श्रेष्ठींना विचारणार आहे की माझा गुन्हा काय ते तरी सांगावं असं म्हणत खडसे यांनी उपस्थित जनतेचे आभार मानले.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 2, 2019, 6:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading