महाविकासआघाडीचं हॉटेलमध्ये शक्तिप्रदर्शन : आता भाजपसाठी उरल्या आहेत या 4 शक्यता

महाविकासआघाडीचं हॉटेलमध्ये शक्तिप्रदर्शन : आता भाजपसाठी उरल्या आहेत या 4 शक्यता

मुंबईत ग्रँड हयातमध्ये 165 आमदारांना एकत्र आणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकजुटीचं दर्शन घडवलं. महाविकासआघाडीच्या या शक्तिप्रदर्शनानंतर आता भाजपच्या विश्वासदर्शक ठरावाचं आणि बहुमत चाचणीचं काय होणार? 145 आमदार भाजप कुठून आणणार?

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर : राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारचा शपथविधी झाला. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी पदभारही स्वीकारला. दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी झाली आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उद्या येईल. या सगळ्या घडामोडींनंतर आता विधानसभेत भाजप बहुमत सिद्ध करणार का?  आणि कसं? यासंबंधी आता 3 शक्यता आहेत.

शक्यता क्रमांक 1

अजित पवारांच्या गटाने भाजपला पाठिंबा दिला आहे. पण अजित पवारांच्या गटात आता त्यांच्याव्यतिरिक्त एकही आमदार नाही, असं चित्र विरोधी आघाडीने रंगवलं आहे. ते खरं असेल तर अजित पवार राष्ट्रवादीत परततील किंवा राजीनामा देतील. अर्थातच भाजपचं हे सरकार बहुमत चाचणीत अपयशी ठरेल. किंबहुना  कर्नाटकात झालं तसं, फडणवीस स्वतः फ्लोअर टेस्ट आधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील.

शक्यता क्रमांक 2

व्हीप काढण्याचा अधिकार अजूनही गटनेते म्हणून अजित पवार यांना आहे, असा भाजपचा दावा आहे. पण राष्ट्रवादीचे नेते यांनी तो खोडून काढला आहे. जयंत पाटील हे त्यांचे नवे गटनेते असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि ते व्हीप काढतील. आता गटनेतेपदी अजित पवार हे विधानसभा अध्यक्षांनी मान्य केलं, तर ते व्हीप काढतील आणि भाजपजे तांत्रिकदृष्ट्या बहुमत असण्याची शक्यता वाढेल.

शक्यता क्रमांक 3

पक्षांतरबंदी कायद्यानुसार, दुसऱ्या पक्षाला पाठिंबा द्यायचा असेल तर दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा लागतो. राष्ट्रवादीचे 54 आमदार आहेत. त्यामुळे 41 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा लागेल. पक्षांतरबंदी कायद्यानुसार शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांवर कारवाई केली तर फडणवीस सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही.

(हेही वाचा : शपथविधी झाला पण भाजपसमोर पक्षांतरबंदी कायद्याचा पेच, काय आहे हा कायदा?)

शक्यता क्रमांक 4

भाजपकडे 105 जागा आहेत. अजित पवारांना 20 ते 25 आमदारांचा पाठिंबा आहे, असं बोललं जातं. त्यामुळे आवाजी मतदान घेतलं तर गदारोळात काहीही होऊ शकतं. हे सगळे आमदार आणि अपक्ष मिळून फोडाफोडीच्या राजकारणात भाजप बहुमत सिद्ध करू शकतं. देवेंद्र फडणवीस सरकारला 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आलीय. त्यामुळे विधानसभेत नेमकं काय होतं त्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

=================================================================================

First published: November 25, 2019, 8:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading