महाविकास आघाडीविरोधात भाजपचं पहिलं आंदोलन, रस्त्यावर उतरून करणार निषेध

महाविकास आघाडीविरोधात भाजपचं पहिलं आंदोलन, रस्त्यावर उतरून करणार निषेध

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत

  • Share this:

मुंबई, 25 फेब्रुवारी : भारतीय जनता पक्षातर्फे आज महाविकास आघाडी सरकारविरोधात पहिल्यांदाच राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले आहे. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन आंदोलन पुकारणार आहेत. आज भाजपकडून राज्यभरातील ४०० ठिकाणी आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील तहसील कार्यालयांसमोर हे आंदोलन केलं जाणार आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. या सर्व घटनांना निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारविरोधा आंदोलन पुकारल्या सांगण्यात येत आहे. या आंदोलनात भाजपचे राज्यातील सगळे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. दुपारी १२ ते ३ दरम्यान हे आंदोलन होणार आहे.

महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पाळले नाही, वचन दिल्याप्रमाणे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत दिली नाही आणि फसवी कर्जमाफी जाहीर करून दिशाभूल केली असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या राज्य सरकारने शेतकऱ्यांसह समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली आहे. या सरकारच्या काळात गुन्हेगारांना धाक न उरल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. याच्या विरोधात धरणे आंदोलनाद्वारे राज्यभरात जनजागृती केली जाणार आहे असंही पाटील म्हणाले आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या कामाबाबत फटकेबाजी केली होती. आता तर भाजपच्या नेत्यांनी आंदोलन पुकारत थेट रस्त्यावरच उतरले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2020 10:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading