भाजपमध्ये तिकिटावरून नाट्य सुरूच, कार्यकर्त्यांची गडकरी वाड्यावर धडक

भाजपमध्ये तिकिटावरून नाट्य सुरूच, कार्यकर्त्यांची गडकरी वाड्यावर धडक

विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

  • Share this:

नागपूर, 2 ऑक्टोबर : उमेदवार यादीची घोषणा झाल्यानंतर भाजपमधील नाराजी उफाळून आली आहे. भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरावर धडक दिली आहे.

भाजपने मध्य नागपूर मतदारसंघात शहराध्यक्ष प्रवीण दटके यांना उमेदवारी न देता विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे दटके यांचे कार्यकर्ते नाराज झाल्याचं चित्र आहे. ही नाराजी त्यांनी आता थेट नितीन गडकरींसमोर मांडली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या उमेदवार यादीची घोषणा केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर पक्षातील बंडखोरी थांबवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे. मुंबईतील A9 या शासकीय बंगल्यासमोर चंद्रकांत पाटील यांची गाडी रोखण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला आहे.

चंद्रकांत पाटलांची गाडी अडवण्याचा प्रयत्न, कार्यकर्ते आक्रमक

भाजपने यंदाच्या निवडणुकीत आतापर्यंत 12 विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं आहे. त्यातच आता उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांचे समर्थक चंद्रकांत पाटलांसमोर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. चंद्रकांत पाटलांच्या गाडीसमोर ठिय्या करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटलांसमोर घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी हटवलं. त्यानंतर पाटील यांनी कशीबशी वाट काढत काढता पाय घेतला. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर भाजपची डोकेदुखी वाढली आहे. कारण तिकीट न मिळालेल्या नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. बंडखोरांनी आता आघाडीशी जवळीक केल्याचंही पाहायला मिळत आहे. तर काही बंडखोरांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे.

VIDEO : सभेत घुसला कुत्रा अन् पवार म्हणाले, 'शिवसेनेची लोकं आली का?'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 04:24 PM IST

ताज्या बातम्या