Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तिकीट कापल्यानंतर शरद पवारांशी चर्चा केली? विनोद तावडेंनी केला खुलासा

तिकीट कापल्यानंतर शरद पवारांशी चर्चा केली? विनोद तावडेंनी केला खुलासा

भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 4 ऑक्टोबर : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीतही भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यासह मंत्री विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांचं तिकीट पक्षाने कापलं आहे. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

'भाजपनं मला तिकिट का दिलं नाही याचा मी विचार करत आहे. निवडणुकीनंतर याबाबत मी पक्षासोबत चर्चा करेन. पण आता ही चर्चा करण्याची वेळ नाही,' असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. मला तिकिट का नाही मिळालं नाही याबद्दल मीही अनभिज्ञ आहे. मी त्याबद्दल आत्मपरीक्षण करत आहे,' असंही तावडे म्हणाले.

'शरद पवारांसोबत चर्चा नाही'

'भाजपने माझं तिकीट कापल्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केल्याचं बोललं जात आहेत. मात्र या सगळ्या अफवा आहेत. मी पवारांशी चर्चा केली वगैरे यात काही तथ्य नाही. मी संघाचा स्वयंसेवक आहे. आता पक्षाला 2/3 बहुमत मिळवून देणं हे आमचं काम आहे,' असं म्हणत विनोद तावडे यांनी पक्षांतराच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

भाजपची चौथी यादी, कुणाला मिळाली संधी?

मुक्ताईनगर - रोहिणी खडसे

काटोल - चरणसिंह ठाकूर

तुमसर - प्रदीप पडोले

नाशिक (पूर्व)- राहुल ढिकले

बोरिवली - सुनील राणे

घाटकोपर (पूर्वी) - पराग शाह

कुलाबा - राहुल नार्वेकर

VIDEO: प्रशासनाच्या भोंगळ कारभार; कंबरेएवढ्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ

First published:

Tags: Maharashtra Assembly Election 2019, Mumbai Thane Election, Vinod tawade