Home /News /maharashtra /

लेकीच्या लग्नात डान्स करणाऱ्या संजय राऊतांवर विखे पाटलांची टीका, VIDEO

लेकीच्या लग्नात डान्स करणाऱ्या संजय राऊतांवर विखे पाटलांची टीका, VIDEO

 भाजपचे (bjp) नेते राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil) यांनी या मुद्यावरूनही टीकेची संधी सोडली नाही.

भाजपचे (bjp) नेते राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil) यांनी या मुद्यावरूनही टीकेची संधी सोडली नाही.

भाजपचे (bjp) नेते राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil) यांनी या मुद्यावरूनही टीकेची संधी सोडली नाही.

    मुंबई, 28 नोव्हेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्या मुलीचा विवाह सोहळा उद्या सोमवारी पार पडणार आहे. आज संगीताच्या कार्यक्रमात बाप म्हणून संजय राऊत यांनी गाण्यावर ठेका धरला. तर दुसरीकडे, भाजपचे (bjp) नेते राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil) यांनी या मुद्यावरूनही टीकेची संधी सोडली नाही. एसटी कर्मचारी, शेतकरी आत्महत्या करत आहे आणि तुम्ही लग्नात काय नाचताय, निदान जणाची नाहीतर मनाची तरी ठेवा? असं वक्तव्य विखे पाटील यांनी केलं आहे. राहाता येथे आयुष्यमान भारत योजनेच्या‌ कार्ड वाटप विखे पाटील यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी बोलत असताना विखे पाटील यांनी संजय राऊत यांनी आपल्या मुलीच्या लग्नात डान्स केल्याच्या मुद्यावरून टीका केली आहे. 'एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत.अन् तुम्ही काय करता,  लग्नात नाचता. लग्नात तुम्ही नृत्य करत आहात. एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. विज कनेक्शन तोडले जात आहेत, गावची गावे अंधारात आहेत आणि तुम्ही नाचताय, निदान जनाची नाही तरी मनाची तरी ठेवा. हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का? अशी टीका विखे पाटलांनी केली. विशेष म्हणजे, संजय राऊत यांच्या मुलगी  पूर्वशी राऊत (Purvashi Raut) सोमवारी (29 नोव्हेंबर) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांचे चिरंजीव मल्हार (Malhar) यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. या लग्न सोहळ्याला राज्यातील सर्व राजकीय नेत्यांना आणि उद्योगपतींना आमंत्रित करण्यात आले आहे. तसंच, 9 नोव्हेंबर रोजी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही लेकीच्या लग्नाचं निमंत्रण दिलं आहे. एवढंच नाहीतर संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना सुद्धा लग्नाला आमंत्रित केले आहे. त्यामुळे विखे पाटील यांच्या या टीकेवरून वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Sanjay raut

    पुढील बातम्या