तसंच, 'फडणवीस यांनी राम कदम, प्रशांत परिचारक, गिरीश महाजन, गिरीश बापट यांच्यावर आधी कारवाई करावी महाराष्ट्र आपोआप सुरक्षित होईल, असा खोचक सल्लावजा टोलाही चाकणकर यांनी लगावला. मुस्लीम आरक्षणावरून आव्हाडांनी फडणवीसांना फटकारले दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देणार अशी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेवरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुस्लीम आरक्षणाला विरोध असेल तर उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं, असं आव्हानच फडणवीसांनी दिलं. तर फडणवीस यांच्या या आव्हानाला जितेंद्र आव्हाड यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. विधानपरिषदेच्या चर्चेमध्ये नवाब मलिक यांनी 5 टक्के मुस्लिम आरक्षण देणार ही घोषणा केली आहे. जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपलं मत सांगितलं असेल तर शासनाचं मत होत नाही. नवाब मलिक यांनी आज विधान परिषदेत शासनाच्या वतीने अधिकृतरित्या सांगितलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत न सांगता विधानसभेत सांगावं. त्यांनी हिंमतीने 5 टक्के मुस्लिमांना आमचा विरोध आहे, असं सांगावं धर्माच्या आधारावर आरक्षण मान्य नाही. हे त्यांनी हिंमतीने सांगावं, पण ते गोलमोल उत्तर देत आहे. जर मुस्लिम समाजाला 50 टक्क्याच्या मर्यादेत आरक्षण दिलं तर ओबीसी आणि मराठा समाजावर परिणाम होईल. याबद्दल मुख्यमंत्री स्पष्ट भूमिका मांडावी, असं आव्हान केलं आहे. जितेंद्र आव्हाडांचा फडणवीसांना टोला गेल्या 5 वर्षामध्ये मुस्लीम समाजाला बाजूला करण्याचं काम भाजपने केलं होतं. आता भाजपने आम्हाला मुळीच मुस्लिम आरक्षणावरून काय करायचे हे शिकवू नये, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस यांना लगावला.राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी फडणवीसांना करून दिली नरेंद्र मेहता प्रकरणाची आठवण@ChakankarSpeaks@NCPspeaks pic.twitter.com/UlmPGODFGL
— News18Lokmat (@News18lokmat) March 3, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.