विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपचं ठरलं! 'या' नावावर सहमती

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपचं ठरलं! 'या' नावावर सहमती

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठी चर्चा सुरू होती. मात्र आता या बाबतचा सस्पेन्स संपला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाआधी झालेल्या भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विधानसभेत भाजपतर्फे आशिष शेलार यांची मुख्य प्रतोद म्हणून तर देवयानी फरांदे यांची प्रतोदपदी नियुक्ती निश्चित करण्यात आली आहे. तसंच गेल्या अनेक दिवसांपासून ज्या विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठी चर्चा सुरू होती, त्याबाबतचा सस्पेन्सदेखील आता संपला आहे.

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपकडून सुजितसिंह ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मात्र अजून याबाबत पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून हिरव्या कंदीलाची प्रतीक्षा आहे. सुरजितसिंह ठाकूर यांच्या नावावर भाजपमध्ये सहमती झाल्याने सुरेश धस, महादेव जानकर आणि विनायक मेटे यांना धक्का बसला आहे. कारण या तीनही नेत्यांनी जाहीरपणे या पदावर दावा केला होता.

'ते' कारण सांगत विनायक मेटेंनी केला होता दावा

विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते पद कोणाला मिळणार? यावर चर्चा सुरू असतानाच शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी या पदावर दावा सांगितला होता. भाजपनं मला मंत्रिपद दिलं नव्हतं, म्हणून आता मला विरोधी पक्ष नेतेपद द्यावं, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली. बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि विनायक मुंडे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात मुंडे-मेटेंमध्ये वारंवार खटके उडत असतात. या पार्श्वभूमीवर विनायक मेटे यांनी विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला होता.

अजित पवार पुन्हा फॉर्मात... एका दिवसात तब्बल तीन मेळावे, आमदारांना दिला 'दम'

महादेव जानकरही होते आग्रही

'घटक पक्षाला विरोध पक्षनेतेपद द्यायचा निर्णय झाला तर मी खरा दावेदार आहे,' अशी भूमिका रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी घेतली होती. भाजपने हे पद स्वतःकडे ठेवलं तर हरकत नाही, पण घटक पक्ष म्हणून माझाच विचार भाजपने करावा, अशी जानकर म्हणाले. एकंदरीत राज्यात सत्ता गमावल्यानंतर विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून भाजपमध्येच संघर्ष होत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं.

Published by: Akshay Shitole
First published: December 15, 2019, 6:06 PM IST
Tags: BJP

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading