'कारवाई केली तर...', अडचणीत सापडलेल्या इंदुरीकरांच्या मदतीला धावला भाजपचा नेता

'इंदुरीकर महाराज जे बोलले ते गुरू चरित्रात आहे. मग त्यात गैर काय आहे?'

'इंदुरीकर महाराज जे बोलले ते गुरू चरित्रात आहे. मग त्यात गैर काय आहे?'

  • Share this:
    सुरेश जाधव, बीड, 16 फेब्रुवारी : 'कोणी तरी काही बोलले म्हणून राज्य सरकार निवृत्ती महाराजांना नोटीस पाठवत असेल तर, राज्य सरकारच्या बुद्धीची कीव करावी वाटते. जर इंदुरीकर महाराजांवर कारवाई केली तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू,' असं म्हणतं भाजपचे माजी मंत्री आणि आमदार सुरेश धस यांनी सरकारवर टीका केली आहे. 'इंदुरीकर महाराज जे बोलले ते गुरू चरित्रात आहे. मग त्यात गैर काय आहे,' असा सवालही सुरेश धस यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'दुर्दैव आहे PCPNDT कायदा आणि इंदूरीकर महाराज बोलले याचा काय संबंध आहे. मला राज्य सरकारची कीव करावी वाटते. या सरकारने इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवली. माझं मत असं आहे की वारकरी संप्रदायाच्या पताका हाती घेवून संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचे किर्तन ऐकले जाते. महाराज जे बोलले ते गुरू चरित्र्यामधील आणि पुराणातील सप्रमाण दाखले आहेत,' असा दावाही सुरेश धस यांनी केला आहे. मानलं या बापाला...शेतकऱ्याने मुलीची पाठवणी केली चक्क हेलिकॉप्टरने 'सातत्याने एका धर्माच्या पाठीमागे लागणे, अगोदर शनी मंदिर, नंतर इंदुरीकर महाराज यांच्या पाठीमागे लागायचे. कोणी काही बोलले म्हणून राज्य सरकारने महाराजांना नोटीस पाठवली असेल तर राज्य सरकारच्या कीव येते. नोटीस पेक्षा पुढची कारवाई केली तर अतिशय दुर्दैवी म्हणावी लागेल. जर कारवाई केली तर आम्ही शंभर टक्के इंदूरीकर महाराजांच्या पाठीमागे राहू. निश्चितपणे आम्ही त्यांची बाजू घेवू,' असं सुरेश धस म्हणाले.
    First published: